हुतात्मा प्रतिष्ठान, डोंबिवली आयोजित 'सायबर सिक्युरिटी जागरूकता अभियान' संपन्न !!
दि. ९ मे व १० मे रोजी मुंबईत हुतात्मा चौक व गेटवे ऑफ इंडिया येथे 'सायबर सिक्युरिटी जागरूकता अभियान' सायं. ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत डोंबिवलीच्या हुतात्मा प्रतिष्ठाण या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुनील कांबळे यांच्या पुढाकाराने आयोजित केले होते.
दि. ९ मे रोजी थायलंड कन्स्युलेटमध्ये व्हिसा ऑफिसर पदावर कार्यरत असलेले श्री. अभिषेक पगारे यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन हुतात्मा चौक येथे झाले. साहाय्यक पोलीस निरीक्षक. श्री. अविनाश शेळके यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे सदर उपक्रमात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून या ठिकाणी भेट देणाऱ्या लोकांशी संवाद सहभागाचे समन्वय केले, ३७८ लोकांनी या विषयावर त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.
सायबर सिक्युरिट संबधीत खालील महत्वाच्या मुद्द्यांवर प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला.
१) सरकारी आस्थापना, संरक्षण दलाच्या आस्थापना, येथील प्रदर्शित केलेली शस्त्रास्त्रे, युद्धनौका, लढाऊ विमाने या सोबत सेल्फी काढल्यास व्हायरल न करणे जेणेकरून शत्रू राष्ट्रांना, असामाजिक तत्वांना माहिती पुरवली जाईल.
२) हनी ट्रॅप मार्फत अजाणतेपणी दिलेली माहिती.
३) एखाद्याच्या अज्ञान, लोभीवृत्ती किंवा अपप्रवृतीमुळे
अनोळखी फाइल्स, ऍपस, वेबसाइटस ओपन न करणे .
४) कृत्रीम बुद्धिमतेद्वारे (AI) फसवले जाऊ शकते.
५) एखाद्या मेसेजची सत्यता न पडताळता किंवा अतिरेकी विघ्नसंतोषी वृत्ती मुळे फॉरवर्ड केलेले मेसेज व व्हिडिओ सामाज माध्यमावर न पसरवणे.
हे अभियान पुढील सहा महिने, ऑक्टोबर २०२५ पर्यंत प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांच्या नेतृत्वात हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने दक्षिण मुंबईतील १३ कार्यकर्ते दक्षिण मुंबईसह, ठाणे, डोंबिवली, कल्याण अशा विविध ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
सौजन्य __
*प्रा. डॉ. सुनिल कांबळे (अध्यक्ष)* *हुतात्मा प्रतिष्ठान, डोंबिवली पूर्व*
No comments:
Post a Comment