माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ निपाणी, मुंबईतर्फे आळंदीत वारकऱ्यांना अल्पोहार वाटप !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
संत ज्ञानेश्वर महाराज (माऊली) पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माऊली सांस्कृतिक क्रीडा मंडळ निपाणी, मुंबई यांच्यातर्फे गेल्या दहा वर्षांप्रमाणे यंदाही आळंदी-दिघी रोड परिसरात मोठ्या भक्तिभावाने आणि सेवाभावाने वारकरी बांधवांना अल्पोहार वाटप करण्यात आले.
यावेळी कीर्तनसेवा करणारे ह.भ.प. बाळकृष्ण सुतार महाराज, मंडळाचे संस्थापक दत्तात्रय पिंपरे महाराज, अध्यक्ष संदीप उतेकर, तसेच करण नायडू यांच्यासह त्यांचे मित्रपरिवार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सेवाकार्यात पत्रकार भीमराव धुळप, मारुती पारते, एकनाथ उतेकर, अजय जाधव, राम शिंदे, अशोक जांभळे गुरुजी, संपत उतेकर, संतोष जाधव, अंकुश उतेकर, सूरज कदम, अनिल केळगणे, आशिष पारते, सौ. प्रिया गिलबिले, सौ. प्रमिला परब, राजेश्री शिंदे, सुमन उतेकर यांचाही सहभाग लाभला.मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते आणि महिला सदस्यांनीही उत्साहाने सहभाग घेत, वारकऱ्यांची मन:पूर्वक सेवा केली. वारकऱ्यांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
No comments:
Post a Comment