Thursday, 19 June 2025

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत व पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय विरार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी, वृक्षारोपण !!

पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत व पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय विरार यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी, वृक्षारोपण !!

**राज्यस्तरीय निबंध, काव्य स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभही थाटामाटात संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर) :

          पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत व पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय विरार पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने ५ जून पर्यावरण दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धा यांचा पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दि. १९ जून २०२५ रोजी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक महाविद्यालय विरार पूर्व येथे संपन्न झाला.
           या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शुभम पाटील मॅडम, श्रीमती रजनी बगे मॅडम उपस्थित होत्या. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी पर्यावरण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विजय चोघळा, राष्ट्रीय सचिव संगीताताई भेरे मॅडम, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री. प्रदीप चव्हाण, राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य व ठाणे जिल्हाध्यक्ष प्रशांत जाधव, महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष श्री.दिनेश चौधरी, वर्तक महाविद्यालयाच्या प्राचार्य शितल कोरडकर मॅडम, मयूर संखे, किरण बनसोडे, श्री.अनंता राऊत, स.आरती पडवळ, पर्यावरण संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राध्यापक हेमांगी सावंत, शितल मॅडम, निखिल नाईक यांनी विशेष मेहनत घेतली. महाविद्यालयाचा पूर्ण स्टाफ, सर्व विद्यार्थी आणि ज्यांनी निबंध स्पर्धा व काव्य स्पर्धेमध्ये एक ते तीन क्रमांक पटकावले ते पुरस्कारार्थी उपस्थित होते.
            कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलाने झाली.पाहुणे तसेच संस्थेतील शंभर विद्यार्थी यांच्या उपस्थितीत मनमोहक तालासुरात लेझीमच्या साथीने वृक्षदिंडी काढण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात पुढील राज्यस्तरीय निबंध स्पर्धेची बक्षीस देण्यात आले. ५ वी ते ७ वी ___
प्रथम- एंजल गणेश नागले मराठा मंदिर हायस्कुल पाली, द्वितीय- कार्तिकी संदीप ओरपे-मराठा मंदिर हायकुल पाली, तृतीय - लावण्या वानखेडे, अमरावती, ८ वी ते १२ वी गट __ प्रथम - स्वस्ति उमेश नागले मराठा मंदिर हायस्कुल पाली, द्वितीय - क्षताक्षि  गजानन पांचाळ न्यू इंग्लिश स्कुल, तृतीय - सिद्धी सुदेश घाटकर न्यू इंग्लिश स्कुल, तर खुला गट मध्ये
प्रथम - छाया प्रमोद खराटे ठाणे, द्वितीय-   कार्तिका हेमंत पाटील- पालघर, तृतीय -  धनश्री अशोक भिलारे -सातारा, आणि उत्तेजनार्थ  म्हणून गोतारने सर -पालघर, तसेच काव्य स्पर्धा निकाल खालील प्रमाणे __
प्रथम -अर्जुन भागा बांबेरे- ठाणे, द्वितीय अक्षता आनंद जाधव -ठाणे, तृतीय -सुरेखा कुलकर्णी -पालघर, अशा प्रकारच्या पुरस्कारार्थी यांचा सन्मान करण्यात आला. श्री.चौघळा सर यांनी प्रास्ताविक सादर केले. तसेच प्रतीक्षा बोर्डे मॅडम यांनी कार्य कार्यक्रमासंदर्भात माहिती सांगितली. गोतारणे सर व अर्जुन बॉम्बे सर यांनी कार्यक्रम संदर्भात मनोगत व्यक्त करत उपक्रमची व या कार्यक्रमाची स्तुती केली. डॉक्टर शुभम पाटील मॅडम यांनी पूर्ण टीमला धन्यवाद दिले व अशाच प्रकारे पर्यावरणाचे रक्षण करणे गरजेचे आहे हे पटवून दिले. या कार्यक्रमासाठी पर्यावरण संस्था सर्व पदाधिकारी पद्मश्री भाऊसाहेब वर्तक विद्यालय सर्व स्टाफ यांनी मोलाचे सहकार्य केले. पावसाच्या सरींच्या वर्षावात हा कार्यक्रम उत्कृष्टपणे आयोजित करण्यात आला होता. पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन आणि पर्यावरण संस्थेचं प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदरच्या स्पर्धांचा आयोजन करण्यात आले असल्याचे  श्री. प्रदीप चव्हाण सर राष्ट्रीय कोषाध्यक्ष यांनी आपल्या छोट्याशा मनोगतात स्पष्ट केले. हेमांगी सावंत मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल नाईक सरांनी आपल्या सुमधुर आवाजामध्ये केले. त्यांचे देखील धन्यवाद सौ.शितल वर्तक यांनी मांडले व कार्यक्रमाची सांगता केली.

No comments:

Post a Comment

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर

समाज हितासाठी झटणारा सामाजिक कार्यकर्ते - अशोक भोईर ——————————————————————————— कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील न्...