Thursday, 19 June 2025

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !!

मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे, क्षयरोग मुक्त भारत अभियानासाठी मोलाचे सहकार्य !!

ठाणे, (पी. डी. पाटील) : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत 'क्षयरोग मुक्त भारत अभियान' निक्षय शिबीरांचे आयोजन भारतभर करण्यात येत आहेत. या शिबिरात जोखमीच्या व्यक्ती म्हणजेच वृद्धाश्रम, अनाथाश्रम, व्यसनमुक्ती केंद्र, ज्येष्ठ व्यक्ती, मधुमेहि व्यक्ती, बीएमआय कमी असलेल्या व्यक्ती, टी बी रुग्णांचे सहवासित अशा सर्वांची या शिबिरात तपासणी करून, क्षयरोग रुग्ण शोधून त्यांचेवर उपचार करणे. हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. 

याच अभियानाचा भाग म्हणून पालघर जिल्हा क्षयरोग केंद्र अधिकारी डॉ शशिकांत साळुंके यांच्या मार्गदर्शनात, वैद्यकीय अधिकारी डॉ सुरभी माजगावकर आणि त्यांचे सहकारी तंत्रज्ञ यांच्या अधिपत्याखाली मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्र, चांदीप, विरार (पूर्व) येथे दाखल असलेल्या व्यक्तींची क्षयरोग चाचणी (CY-TB TEST) व एक्स-रे काढण्यात आले. 

यासाठी वसई तालुका आरोग्य अधिकारी डॉ अंतरा सोनी आणि त्यांचे क्षयरोग पथक (ग्रामीण) यांच्यासोबत प्राथमिक आरोग्य केंद्र, पारोळ येथील डॉ संकेत हेगडे व त्यांच्या आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा सेविका या सर्वांचे विशेष सहकार्य मिळाले. 

याप्रसंगी मिरॅकल फाउंडेशन येथे दाखल असलेल्या व्यक्ती व या ठिकाणी कार्यरत असलेला संपूर्ण स्टाफ अशा एकूण १०४ व्यक्तींची क्षयरोग चाचणी (CY-TB) आणि एक्स-रे घेण्यात आले. यावेळी मिरॅकल फाउंडेशन व्यसनमुक्ती केंद्राचे मानसोपचार तज्ञ डॉ मनोहर यादव हे देखील उपस्थित होते. 

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी वसई तालुका क्षयरोग पर्यवेक्षक श्री योगेश पाटील, मिरॅकल फाउंडेशन युनिट क्रमांक २ चे केंद्र प्रमुख श्री पंकज कौरा, स्टाफ श्री झीशान, श्री अनिकेत व समन्वयक श्री रमेश सांगळे यांनी विशेष पुढाकार घेतला. 

'क्षयरोग मुक्त भारत अभियान' या शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी मिरॅकल फाउंडेशनचे संस्थापक, अध्यक्ष श्री सुभाष (बाबूजी) मनराय यांनी जिल्हा क्षयरोग केंद्र, पालघर येथे पाठपुरावा केला.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...