Monday, 23 June 2025

"कला भूमीपुत्रांची" माध्यमातून आगरी कोळी कराडी संस्कृतीची लोकगीते, कोळीगीते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला‌ !!

"कला भूमीपुत्रांची" माध्यमातून आगरी कोळी कराडी संस्कृतीची लोकगीते, कोळीगीते रसिक प्रेक्षकांच्या भेटीला‌ !!

उरण, दि २३, (विठ्ठल ममताबादे) : आगरी कोळी कराडी समाजातील कुंडेवहाळ गावातील कलाकार अमन कैलास वास्कर आयोजित वारसा संस्कृती आगरी कोळी कराडी कलेचा (कला भूमिपुत्रांची) पारंपरिक लोकगीते कोळीगीते आणि हास्य विनोदांचा बहारदार नजराणा आता सर्वांना अनुभवता येणार आहे. आगरी कोळी कराडी समाजातील बरेच कलाकार आजपर्यंत यूट्यूब आणि टीव्ही सिरीयलच्या माध्यमातून बघत होते. पण आज हे सर्व भूमिपुत्र कलाकार एकत्र येऊन आपली कला थेट प्रेक्षकांपर्यंत पोहचवून रसिक प्रेक्षकांचे लाइव्ह मनोरंजन करण्यासाठी येत्या बुधवारी २५ जून २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता पनवेल मधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह येथे येणार आहेत. तरी सर्वांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून सर्व कलाकारांना प्रोत्साहिक करण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे या कार्यक्रमाचे सर्वेसर्वा निर्माते अमन ज्योती कैलास वास्कर (कुंडेवहाळ) यांनी आग्रहाची विनंती केली असून आगरी कोळी कराडी समाजात प्रथमच सर्व कलाकार एकत्र येऊन कला भूमिपुत्रांची या कार्यक्रमाचा शुभारंभ चा प्रयोग आनंदाने पार पाडणार आहेत. सदर कार्यक्रमात  उरण पनवेल रायगड मधील सर्व भूमिपुत्र कलाकार उपस्थित राहणार आहेत.

No comments:

Post a Comment

उल्हासनगर महानगरपालिकेसमोर भर पावसात दिव्यांगांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन !!

उल्हासनगर महानगरपालिकेसमोर भर पावसात दिव्यांगांच्या हक्कासाठी ठिय्या आंदोलन !! ** साहित्य घोटाळा व मूलभूत हक्क यासाठी प्रहार संघटना आक्रमक  ...