कांबारे - वासिंद रोड येथील तानसा नदीवरील सावरोली ब्रिज सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वाहतूकीसाठी बंद !!
कल्याण, प्रतिनिधी : कांबारे - वासिंद हा महत्त्वाचा रस्ता असून वाडा ते मुंबई नाशिक हायवे ला जोडणारा आहे, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. पण या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून जागोजागी रस्ता उखडून खड्डे पडले आहेत. हा मार्गाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम उपविभाग, शहापूर यांच्या कडे असून याची देखभाल दुरुस्ती करणे हे त्यांचे काम आहे. काल या मार्गावरील सावरोली ब्रिजला तडे गेल्याचे व रस्त्याची दुरवस्था झालेली पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे वाडा तालुकाध्यक्ष जयेश शेलार यांनी तातडीने सा. बा. शहापूर उपविभागीय अभियंता बळवंत कांबळे यांच्या कळविले यावर तातडीने कांबळे यांनी स्वतः जाऊन पाहणी करत हा रस्ता तातडीने वाहतूकीसाठी बंद केला.
आम्ही उपअभियंता बळवंत कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या रस्त्याची पाहणी केली असून आज सदर पुलाचे आमच्या खात्याकडून (सार्वजनिक बांधकाम विभाग) स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे व त्याचा रिपोर्ट उद्या मिळणार असल्याचे सांगितले.
दरम्यान कांबारे - वासिंद रोडवरील अवजड वाहतुक बंद करावी, तसेच नादुरुस्त पुलाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना स्थानिक आमदार दौलत दरोडा यांनी बांधकाम प्रशासनाला केली आहे.
No comments:
Post a Comment