Monday, 16 June 2025

तुळशीदास तांडेल यांनी सानेगुरुजींचे विचार कथामालेव्दारे खेड्यापाड्यात पोहचविले !!

तुळशीदास तांडेल यांनी सानेगुरुजींचे विचार कथामालेव्दारे खेड्यापाड्यात पोहचविले !!

                          
मुंबई, (शांताराम गुडेकर/मोहन कदम) :
          साने गुरुजी कथामालेतील विचार गेली चार दशके पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतील खेड्यातील शाळेतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम समाजसेवक तुळशीदास तांडेल यांनी निस्पृहपणे करून विक्रमगड सारख्या आदिवासी भागातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक, सामाजिक उपक्रमे ते आजही राबवित आहेत, त्यासाठी प्रसिध्दिच्या मागे न लागता करीत असलेली कामे ही आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषद पालघर जिल्हाध्यक्ष तथा आजचा तटरक्षकचे संपादक प्रवीण ना.दवणे यांनी केले.

           साने गुरुजी कथामाला चळवळीचे निस्पृह कार्यकर्ते तुळशीदास तांडेल यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त कांदिवली येथील साई परीवार सेवाभावी ट्रस्ट, सानेगुरुजी कथामाला मुरबे व विकास केंद्र मुरबे यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१५ जून रोजी पालघर तालुक्यातील मुरबे येथील श्री राम मंदिर येथे गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या प्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती तुळशीदास तांडेल, संपादक प्रवीण ना.दवणे, पालघर तालुका मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रकाश वैद्य, साई परीवार सेवाभावी ट्रस्टच्या पदाधिकारी सौ.मनिषा रासम, सदस्य अनिल वडके, महेश वर्मा, समीर भिकाजी सागवेकर, यासिन कादर खान आदिवासी सेवा मंडळ मुंबईचे सेक्रेटरी यशवंत वातास सर आदी मान्यवर उपस्थित होते.

            तांडेल यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी अनेक चाहत्यांनी शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. त्यांच्या सेवाभावी योगदानाबाबत अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालाचे कार्याध्यक्ष बी.एस.पाटील, प्रकाश वैद्य, समाजसेवक वसंत तांडेल, साहित्यिका अनुपमा जाधव, कुंभार सर, साहित्यिका आशाताईं दहाड, ठाणे येथील के.डी.पाटील, वृशाली चुरी, समाजसेविका विद्या संखे आदि मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
            गौरव सोहळ्याच्या प्रारंभा आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यदलातील सर सेनापतीपैकी असलेले सरसेनापती दाजी पासलकर यांचे वंशज वक्ते संजय पासलकर यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी समोर दैववादापेक्षा स्वकर्तृत्वाने वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून स्वतःची प्रगती, समाज हित व राष्ट्रहित जपण्यासाठी उत्कृष्ट प्रबोधन केले.
गौरव सोहळ्याच्या प्रारंभी सानेगुरुजीच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थिनींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे गीत सादर करून स्वागत करण्यात आले.सत्काराला उत्तर देताना तुळशीदास तांडेल यांनी मला दिलेल्या शुभेच्छेमुळे यापुढे कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळाली असून उर्वरित आयुष्य सेवेमध्ये व्यतीत करण्याचे सांगितले.
            या प्रसंगी साई परीवार सेवाभावी ट्रस्टचे संतोष जाधव, अ.भा.मांगेला समाज परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक तांडेल, ठाणे जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष जयकुमार भाय, दीपक अक्रे, मुरबे पंचक्रोशीतील विविध संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हंसा पांचाळ यांनी सत्कार सोहळ्याला साजेसे असे केले.

No comments:

Post a Comment

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !!

श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान तर्फे शैक्षणिक वारी !! आषाढी एकादशी पंढरपूरच्या विठ्ठलाला साकड, मागणं, किंवा भेट घेण्यसाठी अनेक जन ...