Sunday, 22 June 2025

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत शास्त्री नगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम येथे जागतिक योग दिन साजरा !!

कल्याण- डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत शास्त्री नगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम येथे जागतिक योग दिन साजरा !!

कल्याण, (रुपाली तावरे) :
              जागतिक योग दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत शास्त्री नगर रुग्णालय, डोंबिवली पश्चिम येथे २१ जून २०२५ रोजी  सकाळी ७ ते ८ दरम्यान योग दिन साजरा करण्यात आला.यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. दीपा शुक्ल तसेच शास्त्री नगर रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश चौधरी यांचा सहभाग  होता. याशिवाय इतर डॉक्टर्स तसेच रुग्णालयातील कर्मचारी यांनी योगाचे प्रकार व महत्त्व हे अंबिका योग निकेतन, मुंबई या संस्थेद्वारे  प्रशिक्षक श्री.हेमंत पंडित व त्यांची टीम यांच्याकडून प्रात्यक्षिक करून आसने शिकवण्यात आली. आरोग्य सेवेत काम करत असताना मानसिक व शारीरिक ताण दुर करण्यासाठी व रुग्णांना श्वासांची योगासनं, प्राणायाम याबद्दल योगाचे महत्व व जनजागृती करू शकतो असे डॉक्टरांनी मार्गदर्शन करताना नमूद केले. योगा सेशन्स दरम्यान श्री.सुरेश पाटील, सौ.रुपाली तावरे व सौ.सुलेखा देशमुख या स्टाफने पूर्ण योगा कार्यक्रमाचा कार्यभार सांभाळला.

No comments:

Post a Comment

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !!

राज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता १९ जुलै पर्यंत मुदतवाढ !! मुंबई, दि. ९...