Saturday, 21 June 2025

शैक्षणिक साहित्य आणि शालेय फीचे वाटप !!

शैक्षणिक साहित्य आणि शालेय फीचे वाटप !!

मुंबई, (पी . डी. पाटील) : श्री विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप आणि सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच (दि. २०जून, २०२५रोजी) स्व. दीना बामा पाटील रंगमंच, भांडुपगाव येथे शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या हस्ते पार पडला. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुनिल राऊत आणि समाजसेविका राजोल संजय पाटील यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या संस्थेतर्फे प्रत्येक वर्षी विद्यार्थी दत्तक योजनेच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालेय फीचे वाटप केले जाते. यावर्षी १०० विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, गणवेश, सँडल, छत्री व शालेय फी यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला साहित्यिक प्रा. जयवंत पाटील तसेच संस्थेचे निलेश वैती, भावेश कोपरकर, महेश पाटील,रजनी पाटील, उषा काकडे, सोनम कोपरकर, पल्लवी खारकर, स्मिता मिसाळ, डॉ. देविदास किनी, वर्षा वाघिलकर, सुदाम सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

देवतुल्य आई -बाबा माझे गुरु...

देवतुल्य आई -बाबा माझे गुरु...               आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो. आषाढ शुद्ध ...