राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जेष्ठ वद्य नवमी १६७४ तिथीनुसार ३५१ वी पुण्यतिथी भायखळा येथे साजरी !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांची जेष्ठ वद्य नवमी १६७४ तिथीनुसार ३५१ वी पुण्यतिथी निमित्ताने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार मनोज जामसुतकर, वीरमाता जिजाबाई स्मृती मंडळाचे अध्यक्ष भाऊ सावंत, वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाचे संचालक संजय त्रिपाठी, उद्यान अधिक्षक परदेशी, रमेश रावल यांनी पुष्पहार व गुलाब फुल अर्पण करून अभिवादन केले. शुक्रवार दि.२० जून २०२५ रोजी जिजामातेची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
No comments:
Post a Comment