Wednesday, 23 July 2025

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवलीचा  वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               मैत्रेय बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचालित जी.के. एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडावलीची २२ जुलै २०१२ या दिवशी स्थापना झाली आहे. महाविद्यालयास  १३ वर्षाचा कालावधी पूर्ण झाला आहे..जी.के. एस. कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय खडवली अंतर्गत श्रीमती कविता शिकतोडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वर्धापन दिन मोठया थाटामाटात संपन्न झाला. वर्धापनदिन कार्यक्रमास प्रमुख अतिथी कॉलेजचे प्राचार्य डॉ.बी.एल.जाधव सर उपप्राचार्य श्री.प्रशांत तांदळे सर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.विकास सावंत सर, उपप्राचार्य श्री.शफिक शेख सर यांचे मार्गदर्शन  लाभले.

             या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका रिया बांगर मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्राध्यापिका रसिका लोकरे मॅडम यांनी सादर केली. महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा प्राध्यापक प्रशांत तांदळे सर यांनी दिला.तसेच प्राध्यापक घरत सर, प्राध्यापक सावंत सर, प्राध्यापक शेख सर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व मार्गदर्शनातून सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापिका नीता वाघ मॅडम यांनी केले. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांना संस्थेमार्फत भेटवस्तू देण्यात आली व वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास विद्यार्थी व कर्मचारी वर्ग अत्यंत उत्साहात सहभागी होता. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

No comments:

Post a Comment

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली !!

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली !! उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील वशेणी...