Tuesday, 22 July 2025

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

विविध उपक्रम राबवून अजित दादा पवार यांचा वाढदिवस वाडा तालुक्यात साजरा !!

वाडा, प्रतिनिधी :
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाडा तालुका राष्ट्रवादीच्यावतीने मंगळवार (दि.22 जुलै) रोजी विविध उपक्रम राबविण्यात आले. 

सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय वाडा येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले. तर भाजीपाला विक्रेत्या महिलांना जंबो छत्र्यांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर श्री क्षेत्र तीळसेश्वर येथे व गारगाव शासकीय आश्रम शाळा येथे वृक्षारोपण करण्यात आले. तसेच जिल्हा परिषद मांगरूळ (वंगणपाडा) येथे विद्यार्थ्यांना वह्या, शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

या सर्व उपक्रमांसाठी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा रोहिणीताई शेलार, वाडा तालुका अध्यक्ष जयेश शेलार, आमदार दौलत दरोडा यांचे स्वीय सहाय्यक रोहीदास शेलार, महिला जिल्हा उपाध्यक्षा चित्राताई पाटील, तालुका सरचिटणीस महेश भोईर, तालुका उपाध्यक्ष भगवान भोईर, संगीत मेने, जिल्हा युवक उपाध्यक्ष नंदकुमार वेखंडे, तालुका सचिव मिलिंद सुतार, युवक तालुका अध्यक्ष नितीन देसले, विभागीय उपाध्यक्ष अशोक नाईक, आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष सुधीर विशे, पीक उपसरपंच दीपक पाटील, मांगरूळ उपसरपंच चंद्रकांत दुधवडे उपसरपंच कल्पेश लुटे, 
यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
 --------------------------------
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्यभर जनविश्वास सप्ताह साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने राष्ट्रवादीच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले.
- जयेश शेलार 
(वाडा तालुका अध्यक्ष : राष्ट्रवादी)

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...