उरणमध्ये 'रत्नागिरी ८' भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने लागवड !!
** शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राचे मार्गदर्शन
उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील आवरे गावातील शेतकरी काळुराम पोशीराम गावंड यांच्या शेतात रत्नागिरी ८ या भात वाणाची ४ सूत्री पद्धतीने यशस्वीरित्या लागवड करण्यात आली. तालुका कृषी अधिकारी श्रीमती अर्चना सूळ नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रायोगिक उपक्रम राबवण्यात आला.
या प्रात्यक्षिकादरम्यान, उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना ४ सूत्री भात लागवड पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या आधुनिक लागवड पद्धतीमुळे होणारे विविध फायदे समजावून सांगण्यात आले.
कोट (चौकट ):-
चार सूत्री भात लागवड पद्धतीचे फायदे:-
* उत्पादन वाढ: या पद्धतीमुळे भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.
* पाण्याचा कार्यक्षम वापर:- पाण्याची बचत होते आणि पाण्याचा अधिक प्रभावीपणे वापर होतो.
* खतांचा योग्य वापर:- खतांचा योग्य वापर होऊन त्यांची कार्यक्षमता वाढते.
* रोग आणि कीड नियंत्रण:- पिकांवरील रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
* श्रम आणि वेळेची बचत:- पारंपरिक पद्धतीपेक्षा कमी वेळात आणि कमी श्रमात लागवड करता येते.
No comments:
Post a Comment