भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न !!
मुंबई, (केतन भोज) : मुंबई येथील भारतीय नौदलाच्या बेस शेजारी, कुर्ला एल.बी.एस. मार्गावरील श्री.सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत भारत-पाकच्या बॉर्डरच्या राजाची मूर्ती साकारण्यात येत आहे. भारत-पाक पुंछ सीमेवर विराजमान होणाऱ्या या गणेशाची मूर्ती दरवर्षी मुंबईतून काश्मीरला नेली जाते. यंदाचे हे मूर्तीचे सोळावे वर्ष आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील पुंछ जिल्ह्यात विराजमान होणाऱ्या राजाचा पाद्यपूजन सोहळा रविवारी दि. २७ जुलै २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. भारत-पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला त्यावेळी ईशरदिदी (मानवाधिकार कार्यकर्ता), छत्रपती आवटेदादा, मंगेश मस्तुद, प्रमोद चव्हाण, बाळू राऊत, अजित घगवे, विनीत पटेल, जगदीश बुछडा, अनुप सोनी, किरण भड, सुहेल तसेच प्रोग्रेसिव्ह नेशन एनजीओ चे कार्यकर्ते उपस्थित होते. भारत-पाक सीमेवर पुंछ येथील पुलस्त नदीच्या तटावर मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशरदीदी तसेच समाजसेवक व शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती आवटे व प्रोग्रेसिव्ह नेशन एनजीओ कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात विराजमान होणाऱ्या गणेशाला भारत-पाक बॉर्डरचा राजा म्हणून संबोधले जाते. भारतीय जवानांना देखील गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई मध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे मुंबईतून सर्वांचे प्रेम आशिर्वाद घेऊन मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशरदीदी जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ या ठिकाणी गणेशाची मूर्ती घेऊन जातात. जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोठ्या हर्ष उल्हासात गणरायाचे स्वागत करतात व जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ या ठिकाणी गणरायाला विराजमान करण्याचे हे अखंडीत सोळावे वर्ष आहे.
No comments:
Post a Comment