*" कारगिल विजय दिवस साजरा "*
भारतीय सैनिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खडवली पुर्व कल्याण येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कमांडर (एनसीसी) प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांच्या व्याख्यानाद्वारे "कारगिल विजय दिवस" काल व आज - विद्यार्थ्यांना वाटणारी संरक्षण दलाविषयी आत्मीयता हा विषय चर्चिला गेला.
तसेच *"एन. डी. ए परीक्षा व अभ्यासक्रम"* यांचा दृकश्राव्य माध्यमातून दोन तास उद्बोधन केले. भारत सैनिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे कमांडंट कर्नल श्री. शंकर यादव (निवृत्त) यांच्या कल्पनेतून आजचा "कारगिल विजय दिवस" अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला.
प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांनी डॉकयार्ड एप्रेंटिस स्कूल परीक्षा, अग्निवीर, नेव्हल अकॅडमी, एयर ट्रॅफिक कंट्रोल यांचे मूलभूत मार्गदर्शन व एन. डी. ए.,परीक्षा,विषय मूल्यांकन व तयारी यावर विस्तृत व्याख्यान दिले.विद्यार्थी व शिक्षण यांनी आपल्या शंका प्रश्नोत्तरे कार्यक्रमात विचारल्या.
हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने भूदल, नौदल, वायुदल या संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांच्या परीक्षा, त्यांची संकेतस्थळे या बाबत संक्षिप्त माहिती असलेली पत्रके संस्थे मार्फत वितरित करण्यात आली.
सौजन्य / वृत्तांत - अश्विनी निवाते
No comments:
Post a Comment