आई वडिलांनी केली आत्महत्या, आणि नोकरी ऐवजी कल्पनाचा संसार पडला उघड्यावर !!
**सुकाळवाडी तील बारवी प्रकल्प बाधीत अदिवासी कुंटूबाला न्याय मिळणार कधी,, ?
मुरबाड { मंगल डोंगरे } : मुरबाड पासून हाकेच्या अंतरावरील सुकाळवाडी गाव, बारवी धरणग्रस्त आदिवासी समाजाची वस्ती, येथील मंगल उघडा यांची जमीन बारावी धरणात बाधित झाल्याने परवड झालेल्या कुटुंबातील "करण उघडा,, या मुलाला एमआयडीसी ने नवी मुंबई महापालिकेत नोकरी दिली, शिपाई म्हणून आरोग्य विभागात 3 महिने काम केल्यानंतर करन उघडा यांचे अपघाती निधन झाले, कुटुंबातील एकुलता एक कमवता मुलगा निघून गेल्यानंतर हताश झालेल्या "मंगल उघडा, यांनी एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेत मदतीची याचना केली, एकदोन नव्हे तर तब्बल 3 वर्ष सरकार दरबारी हेलपाटे मारूनही अनुकंपाद्वारे एकुलत्या एक मुलीला नोकरी मिळत नाही, महसूल खाते आणि महापालिका न्याय देत नाही, स्थानिक आमदारानी पत्राद्वारे मागणी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर मंगल /संगिता उघडा या दाम्पत्यांनी कीटक नाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली, या प्रकल्पग्रस्त कुटुंबाची परवड होऊन संपूर्ण संसार उघड्यावर आला, कायदे आणि नियमात एक प्रकल्पग्रस्त कुटुंब धुळीस मिळाला, पण त्यांना मात्र ना न्याय मिळाला की मदत, सुकाळवाडीत त्या कुटुंबातील आईवडिलांचे छत्र हरवलेल्या एकमेव वारस कल्पना हिला १५ दिवसा पुर्वी कन्यारत्नाचा लाभ झासा असून या शासनाच्या लाडक्या बहिणीला मदतीचा हातभार लावावा असे शासनाला वाटत नाही, असे असतांना या दूर्दैवी घटने नंतर आज २६ रोजी सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी सुकाळवाडीत जाऊन या तरूणीची भेट घेऊन प्रापंचिक साहित्य किराणा सामान, चादर, धान्य आणि दहा हजार रोख मदत करून कुटुंबाचे सांत्वन केले.
मुरबाड तालुक्यात विविध राजकीय पक्षांनी कार्यकर्ते मेळावे घेऊन मांसाहारी पार्टी झोडत गटारी साजरी केली पण उघड्यावर संसार आलेल्या त्या उघडा कुटुंबाला मात्र साधी मदत करता आली नाही हेच करणी आणि कथनी मधील फरक असलेल्या राजकीय मंडळी नी दाखवून दिले.
**अनाथांची माय सिंधूताई सकपाळ यांचे मानसपुत्र बबन हरणे यांनी या अभागी कल्पना ला मदतीचं मोलाच योगदान देऊन आपला समाजसेवेचा वसा जोपासला**
No comments:
Post a Comment