इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार मिळाला !!
मुंबई, सुनील भोसले : रोजी सीईडी फाउंडेशनने मुंबईतील अरिचिड इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एसडीजी स्कूल पुरस्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी संपूर्ण भारतातील ७० शाळांची निवड करण्यात आली. मानखुर्द येथील इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. अशोक गुप्ता यांना एसडीजी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सीआयडीच्या संस्थापक डॉ. प्रियदर्शिनी नायक आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पडये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यावर डॉ. गुप्ता यांचे मित्र आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. या पुरस्कारामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
No comments:
Post a Comment