Saturday, 26 July 2025

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

पुणे जिल्हा, प्रतिनिधी (स्नेहा उत्तम मडावी) :
आजच्या महाराष्ट्रात जेव्हा खऱ्या नेतृत्वाबद्दल चर्चा होते, तेव्हा पहिलं नाव घ्यावं लागतं ते अजितदादांचं कारण, दादा म्हणजे झपाटलेपणाचं, निर्णयक्षमतेचं आणि निष्कलंक कार्यक्षमतेचं प्रतीक. प्रशासनावर अत्यंत अचूक पकड असलेले, कोणताही विषय खोलवर समजून घेणारे आणि निर्णय घेताना लोकहिताला अग्रक्रम देणारे आणि रोखठोक बोलणारे गरिबांचा खरे कैवारी **दादा हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेता आहेत त्यांचं नेतृत्व हे केवळ राजकीय नसून, सामान्य माणसाला स्फूर्ती देणारं आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी झटणारे, प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने पाहणारे, आणि **माणुसकीचा गहिरा स्पर्श असलेले दादा आज कोट्यवधी जनतेचा आधार, विश्वास आणि बळ बनले आहेत
खेड तालुक्यातसुद्धा अशाच एका नेतृत्वाची प्रतिमा दिसते, ती म्हणजे आमचे मार्गदर्शक, माजी आमदार मा. दिलीप अण्णा मोहिते पाटील अजितदादांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या अण्णांच्या नेतृत्वशैलीतही तोच झपाटलेपणा, तीच लोकांसाठीची धडपड, आणि जनतेशी असलेली नाळ जाणवते. त्यामुळेच आम्ही त्यांना “*कार्यसम्राट*” ही उपाधी देतो. पद असो वा नसो, अण्णा नेहमीच लोकांसाठी झटत राहतात हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी ओळख आहे. 

सप्तरंग कलेक्शन आणि सप्तरंग मिसळ हाऊस या आमच्या व्यावसायिक उपक्रमाच्या उद्घाटनाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित राहिले ही आमच्यासाठी अभिमानास्पद आणि संस्मरणीय बाब ठरली. एक तरुण उद्योजक म्हणून मला आणि माझ्या पत्नीला, सौ. अश्विनी पाचारणे यांना, दादांकडून मिळालेली ही *प्रोत्साहनाची ऊर्जा आजही प्रेरणा देते. दादांची शिस्त जितकी ठाम, तितकीच त्यांची माणुसकीही अपार. उद्घाटनाच्या दिवशी दादांनी हसत-हसत म्हटलं, “अरे बाबा, सप्तरंग मिसळ हाऊसचे उद्घाटन झालं पण मला काही मिसळ खायला मिळाली नाही बुवा !” या मिश्किल वाक्याने सगळं वातावरण हलकं-फुलकं होऊन सर्वीकडे हास्यकल्लोळ झालं. हीच दादांची खासियत प्रेमळ, हसतमुख आणि सर्वांशी सहज संवाद साधणारे नेतृत्व.
त्या कार्यक्रमात सौ. अश्विनी पाचारणे यांनी दादांकडे एक विनंती केली मा. दिलीप अण्णांना विधान परिषद आमदार करावे परंतु दादा एका कार्यकर्त्याने दिलेले पत्र वाचण्यात व्यस्त असल्यामुळे अश्विनीताईंनी सांगितलं दादा तुमच आमच्याकडे लक्ष नाहीये त्यावेळेस त्यावर दादांनी आपल्या खास शैलीत आणि हळुवार भाषेत उत्तर दिलं हो हो माझं लक्ष आहे आणि मान हलवली. हेच दादांचं वैशिष्ट्य ते फक्त राजकारणी नाहीत, तर समाजकारणाच्या प्रत्येक पैलूसोबत जोडलेले देवमाणूस आहेत. दादांचा स्पष्टवक्तेपणा, अचूक काम करण्याची कार्यशैली आणि निर्णयक्षम वृत्ती यामुळे त्यांचं नेतृत्व हे आजच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. म्हणूनच आम्हा लाखो कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. आपली लोकसेवेची भावना अधिकाधिक दृढ होत जावो. आपलं नेतृत्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहो. आपण अशीच निस्वार्थपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहावं… हीच सदिच्छा. 

** दादांना मनापासून अभिवादन आणि वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! 

शुभेच्छुक : सौ.अश्विनी राजेंद्र पाचारणे, उपाध्यक्ष - राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड आणि श्री.राजेंद्र शांताराम पाचारणे सर्वेसर्वा  - आरीकेत ग्रुप ऑफ कंपनीज - चाकण - खेड.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...