Sunday, 27 July 2025

समतावादी विचारांचे प्रचारक प्रकाश कासे व सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे निधन..

समतावादी विचारांचे प्रचारक प्रकाश कासे व सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे निधन.. 

       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : बोधिसत्व सेवा संघ तिलोरे भावकीचे विद्यमान अध्यक्ष धम्म उपासक प्रकाश केशव कासे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे राज्य सचिव, माणगांव तालुका बौद्ध समाज समन्वय समिती चे कोशाध्यक्ष धम्म उपासक सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या तिलोरे येथील राहत्या घरी शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता तिलोरे येथील बौद्ध स्मशान भूमीत बौद्ध धम्माच्या रीतीरिवाजां प्रमाणे करण्यात आला. त्यांच्या अंत्यविधीसाठी माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धम्म उपासक, उपासिका आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर व विविध सामाजिक धार्मिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा जलदान विधी, पुण्यानुमोदन अभिवादन सभा कार्यक्रम त्यांच्या तिलोरे येथील राहत्या घरी रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

      कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, मुलगी जावई असा मोठा परिवार आहे. सामाजिक धार्मिक क्षेत्रातासह कौटुंबिक जीवनात आदर्शवत असलेल्या लक्ष्मीबाई केशव कासे या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या व प्रचंड मेहनती, कष्टाळू आणि सुसंस्कारी होत्या. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवना नंतर त्यांचे पती केशव कासे यांच्या समवेत शेती व्यवसायात प्रचंड काबाडकष्ट केले. त्या उभयतांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार दिले. आज त्यांची मुलं, सुना, नातवंडे विविध महत्वपूर्ण क्षेत्रात मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत असून त्यांचे कुटुंब प्रगती पथावर आहे. याचे सर्व श्रेय कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई आणि पिताश्री केशव कासे यांना जाते. कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे ह्या केवळ नावानेच लक्ष्मीबाई नाही तर कासे कुटुंबियांच्या घरातील सर्वार्थाने लक्ष्मी होत्या. त्यांच्या निधनाने कासे कुटुंबीय, सगेसोयरे नातेवाईक आणि तिलोरे बोधिसत्व सेवा संघावर दु:खाची शोककळा पसरली आहे. कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांना पत्रकार विश्वास गायकवाड आणि सहपरिवार बोरघर, माणगांव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...