रामनगर सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार ...
*** आशिर्वाद कोणाचा ?
घाटकोपर, (केतन भोज) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये नाल्यालगत वसलेल्या झोपडपट्टी वासियांच्या संरक्षणार्थ नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम अंतर्गत १६९ घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२३ मधील रामनगर- ब सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कंत्राटदाराला खुश करण्यासाठी जास्त रक्कमेचे टेंडर काढण्यात आले होते. आणि त्यामधील निम्म्याहून कमी रक्कम खर्च करून हे काम करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे. यासाठी याला आशिर्वाद नक्की कोणाचा आहे ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच मनपा एन विभागाचे प्रभाग क्रमांक १२३ (देखभाल)चे जबाबदार अधिकारी यांची भूमिका देखील याठिकाणी संशयास्पद असून या सर्व प्रकरणाची आणि या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी महापालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असून मनपा एन विभागाचे (देखभाल) प्रभाग क्रमांक १२३चे संबंधित अधिकारी आणि सदर कामाच्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
No comments:
Post a Comment