Friday, 25 July 2025

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

*** संरक्षण भिंतींच्या निधीलाचं संरक्षणाची गरज

विक्रोळी, (केतन भोज) : म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथील संरक्षक भितींच्या कामांमध्ये महाघोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग आहे त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या घटनांना आळा घालण्यासाठी म्हाडाने ठिकठिकाणी दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी मंजूर करून त्यासाठी निधी देखील पास केला होता. विक्रोळी पार्कसाईट मध्ये एकूण २७ संरक्षण भिंतींच्या कामासाठी आतापर्यंत निधी मंजूर होऊन त्या म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मंजूर ही झाल्या आहेत. तसेच अजून ही पुढे विक्रोळी पार्कसाईट करिता नऊ संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. फक्त आता त्याच्या वर्क ऑर्डर निघायच्या बाकी आहे. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर आणि वर्क ऑर्डर निघून देखील संरक्षण भिंतींचे बांधकाम चालू झालेले नाही. तसेच काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम याआधी पूर्ण होऊन ही त्या पुन्हा- पुन्हा नव्याने मंजूर केल्या गेल्या आहेत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मग एवढा निधी कुठे गेला ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक संबंधित प्रशासनाला विचारत आहेत. या पावसाळ्यात देखील विक्रोळी पार्कसाईट मधील डोंगराळ भागात संरक्षण भिंतींअभावी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर येथील स्थानिक लोकांना जीव मुठीत घेऊन जगाव लागत आहे.मात्र तरी संबंधित प्रशासनाला याचेे काहीही देणेघेणे नसल्याचे याठिकाणी दिसत आहे. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत डोंगर उतारांवरील भागांमध्ये संरक्षण भिंत उभारण्यात येतात. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम केले जातंय. मात्र सध्या स्थितीत विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतीच्या कामात मोठ्या प्रमाणावर महाघोटाळा झाला असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा धकादायक प्रकार विक्रोळी पार्कसाईट मध्ये समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मधील अनेक भागांमध्ये संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली, तद्दन खोटे कागदी घोडे नाचवत यामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीच्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी फक्त संरक्षण भिंतींच्या नावाखाली टेंडर काढली जात आहेत का? तसेच यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपये लाटल्याचं धडधडीत प्रकार याठिकाणी समोर आला आहे. यामध्ये म्हाडा दक्षता विभागाची भूमिका देखील संशयास्पद असल्याची दिसत असून, यामुळेच विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा झाल्याचे तरी दिसत आहे. म्हणूनच निव्वळ संरक्षण भिंतींचे खोटेनाटे बुजगावणे उभे करत स्थानिक रहिवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या संबंधित प्रशासनाचा याठिकाणी पर्दाफाश करावा असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच आता या संरक्षण भिंतींच्या निधीलाच संरक्षण देण्याची गरज याठिकाणी दिसत आहे.

1 comment:

  1. विक्रोळी पार्क साईट मध्ये S. R. A. प्रोजेक्ट रखडला आहें. अनेक रहिवाशी त्रस्त आहेत. त्या बद्दल दाखल sarkar कडून दाखल घेणे गरजेचे आहें. Dhokhadyak स्तिथी आहें.

    ReplyDelete

अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम !!

अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम !! वाडा (प्रतिनिधी) : वाडा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रेय...