Tuesday, 22 July 2025

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद !!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद !!

** पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक ; पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मिळाला वाव 

उरण दि २२, (विठ्ठल ममताबादे) :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच महिला व बालविकास मंत्री कु. अदितीताई तटकरे व मा. आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली, जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार श्री. सुनीलजी तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त "पाककला स्पर्धा २०२५" उरण तालुक्यातील चिरनेर गावातील पी.पी. खारपाटील हायस्कूल व कॉलेज येथील हॉलमध्ये  आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा महिला अध्यक्षा उमाताई संदिप मुंढे, जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रतिमाताई जाधव, उरण तालुका अध्यक्षा कुंदा ठाकुर, उरण तालुका उपाध्यक्षा सुमिता तुपेकर, प्राध्यापिका सुलोचना सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या भारती समाधान कटेकर, उज्ज्वला सुनिल ठाकुर , सुगंधाताई सुभाष कडू, कामिनीताई मच्छींद्र  ठाकुर, चिर्ले ग्रामसंघ बचतगट अध्यक्षा विश्रांतीताई रमाकांत घरत, साक्षी ताई धुमाळ, जान्हवी मॅडम, सि.डी.पी.ओ. पल्लवीताई भोईर, उरण तालुका अध्यक्ष  परिक्षीत दादा ठाकुर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकुर उपस्थित होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचीही मोठी उपस्थिती होती.

सदर स्पर्धेत सुत्रसंचालक श्याम ठाकुर यांनी सुंदर असे सूत्रसंचालन केले तर परिक्षक म्हणून जिल्हा महिला उपाध्यक्षा प्रितमताई जाधव यांनी भुमिका पार पाडली. पाककला स्पर्धेत शेवग्याचे पकोडे, कडीपत्ता चटणी, मिक्स थालीपीठ, केशर फालुदा, चिंबो-या लालिपॉप, रव्वा आप्पे, तांदूळाचे लाडू, भाकरी, चिकन, ओले वाटण, तांदळाची खीर आदी पदार्थ बनविण्यात आले होते. पाकलला स्पर्धेमध्ये महिला भगिनींनी सर्वच पदार्थ इतके चविष्ट बनवले होते कि परिक्षकांना कुणाला बक्षीस द्यावे असा प्रश्न पडला होता. पाककला स्पर्धा कार्यक्रम पार पाडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सहकारी मित्र मैत्रिणींचे मोलाचे सहकार्य लाभले. पी.पी.खारपाटील हायस्कूल व कॉलेज यांनी  हॉल  तसेच माईक सिस्टीम, टेबल आणि खुर्च्यांची व्यवस्था केली. एकंदरीत पाककला स्पर्धा २०२५ मोठया उत्साहात उत्तम प्रतिसादासह संपन्न झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आयोजित पाककला स्पर्धेला महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सदर पाककला स्पर्धेचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सदर पाककला स्पर्धेतून महिलांच्या कलागुणांना, कौशल्यांना मोठया प्रमाणात  वाव मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे महिलांच्या कला गुणांना प्रोत्साहन देण्याच्या या उपकमातुन नवनवीन महिला उद्योजक तयार होण्यासाठी हातभार लागणार आहे. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते.


कोट (चौकट ):- 

एकुण सहभागी स्पर्धक ४३,

प्रथम क्रमांक : सौ. स्नेहा नितीन ठाकुर  ( चिरनेर )
द्वितीय क्रमांक : सौ.राणी सागर ठाकुर ( धुतूम),
तृतीय क्रमांक : सौ.प्रणाली प्रविण घरत  ( धुतुम ),
उत्तेजनार्थ - 
सौ. अर्पिता जगदिश जोशी ( चिरनेर ),
सौ. ज्योती सुरेश म्हात्रे ( चिरनेर  ),
सौ. आश्विनी ज्ञानेश्वर ठाकुर ( धुतुम )

No comments:

Post a Comment

जेष्ठ पत्रकार आणि समाजसेवक सहदेव शिवा तांबे यांचे मुंबईत निधन !!

जेष्ठ पत्रकार आणि समाजसेवक सहदेव शिवा तांबे यांचे मुंबईत निधन !! मुंबई, (पी.डी.पाटील) : कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ ता...