Sunday, 13 July 2025

कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन !!

कुटुंबिनी उरण महिला संघ तर्फे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन !!

** मोठया संख्येने सहभागी होण्याचे महिलांना आवाहन 

उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) :
समस्त महिलांना आत्मनिर्भर बनविण्याच्या दृष्टीने तसेच महिलांच्या विविध कला गुणांना, कला कौशल्यांना वाव देण्याच्या दृष्टीकोणातून, भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा जपला जावा या हेतूने कुटुंबिनी उरण महिला संघ या सामाजिक संस्थेतर्फे शनिवार दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३ वाजता शेप्स जिमखाना टेरेस उरण येथे मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांमधून सर्वोत्कृष्ट रंगभूषा,सर्वोत्कृष्ट उखाणा, सर्वोत्कृष्ट लक्षवेधी चेहरा, सर्वोत्कृष्ट नृत्य, सर्वोत्कृष्ट  वेशभूषा, सर्वोत्कृष्ट शृंगार, सर्वोत्कृष्ट शृंगार व वेशभूषा (कुमारिका) महिला निवडण्यात येणार आहेत. त्यांना  विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. विजयी स्पर्धेकांना रोख रक्कम व आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत. दरवर्षी या मंगळागौर कार्यक्रमात महिलांचा मोठया प्रमाणात सहभाग असतो. दरवर्षी या कार्यक्रमाला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतो. यंदाचे मंगळागौर कार्यक्रमाचे हे ३ रे वर्ष आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महिला भगिनींनी मंगळागौर कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी व्हावे, नाव नोंदणी साठी श्लोक पाटील - ९००४११३८५८, आरती ढोले -९९६७९५५९३३ यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !!

मुंबई प्रभाग १४४ मध्ये राजकीय भूकंप; महिला शाखा संघटक ममता भंडारी यांचा शिवसेनेचा राजीनामा !! मुंबई (शांताराम गुडेकर) :         ...