Friday, 18 July 2025

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा घेतला भटक्या कुत्र्याने चावा - कल्याण (टावरीपाडा / शंखेश्वर प्रेसिडेन्सी येथील घटना) !

महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याचा घेतला भटक्या कुत्र्याने चावा - कल्याण (टावरीपाडा / शंखेश्वर प्रेसिडेन्सी येथील घटना) !

*** केडिएमसी घनकचरा विभाग असुरक्षित तर नागरीकांचे काय ?

कल्याण, प्रतिनिधी - कल्याण मध्ये भटक्या कुत्र्यांच्या संबंधित अनेक घटना वारंवार घडत असतात याबाबत वृत्तपत्र, सोशल मीडियामध्ये याचे व्हिडिओ देखील येत असतात आणि याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आली, परंतु तक्रारी नंतर संबंधित परिसरातील कुत्र्यांना लसीकरण करून पुन्हा त्याच परिसरात सोडण्यात येते त्यामुळे पुन्हा नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून नुकत्याच शंकेश्वर प्रेसिडेन्सी टावरीपाडा येथे दिनांक 17 जुलै रोजी कचऱ्याची गाडी कचरा उचलण्यासाठी आली असता  कामगारालाच कुत्र्याने चावा घेतल्याने जर घनकचरा विभागाचे कर्मचारी, कामगार असुरक्षित नसेल तर नागरिकांच्या सुरक्षतेचा काय घ्यायचं ? असा प्रश्न महानगरपालिकेतील रहिवाशांना पडला असून याबाबतीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून याच्यावर एक धडक मोहीम घेण्यात यावी अशी नागरिकांची मागणी असून संबंधित आरोग्य व घनकचरा विभागाला याबाबत पत्र देण्यात येणार असून यावर त्वरित कारवाईसाठी आयुक्तांनी आदेश देण्यात यावे व तसेच  होसिंग सोसायटीनी आपले कचरा डब्बे हे शेड बनवून त्यामध्ये ठेवावे जेणेकरून उघड्यावरील कचरा डब्यांमुळे कुत्र्यांचा वावर कमी होईल अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी दिली,

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...