Friday, 18 July 2025

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !!

विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकल लिंगायत समाज तर्फे वाशी येथे निषेध आंदोलन !!

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
महाराष्ट्र राज्याततील प्रत्येक समाजाचा सामाजिक,आर्थिक, सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी स्वतंत्र महामंडळे स्थापन करून मोठ्या प्रमाणात निधी दिला गेला आहे. मात्र लिंगायत समाजावर अन्याय करत महामंडळाचा लाभ घेण्यापासून या समाजाला वंचित ठेवण्यात आला आहे. 

इतर मागास बहुजन कल्याण विकास महामंडळ अंतर्गत जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) म्हणून स्थापन करण्यात आली होती. परंतु त्याचा लाभ लिंगायत समाजातील ज्या जाती ओबीसी प्रवर्गात येतात अशा केवळ ५ % टक्के लोकांना होतो. ओबीसी महामंडळ अंतर्गत स्थापन केलेल्या या महामंडळाचा लाभ फक्त लिंगायत समाजातील ओबीसी प्रवर्गात येणाऱ्या जातींना होतो. परंतु महाराष्ट्र राज्यात लिंगायत समाज ९५% ओपन (खुल्या प्रवर्गात) येतो. त्यामुळे या महामंडळाचा लाभ ९५% ओपन खुला प्रवर्गात येणाऱ्या जातींना घेता येत नाही. तसेच या महामंडळासाठी केवळ रु. ५० कोटी ची तरदूत केली असल्यामुळे समाजोपयोगी उपक्रम राबवणे समाजाचा विकास करणेसाठी हि रक्कम अपुरी असल्यामुळे रु.५०० कोटी  निधीची तरतूद करावी अशी लिंगायत समाज, विविध संघटना, संस्था यांनी मांडली आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षातील आमदार यांनी देखील सातत्याने हा विषय सभागृहात मांडून देखील स्वतंत्र महामंडळ स्थापन होत नसल्यामुळे सरसकट लिंगायत समाजाला 'जगतज्योती महात्मा बसवेश्वर लिंगायत आर्थिक विकास महामंडळाचा' लाभ मिळत नाही. म्हणून महाराष्ट्रातील लिंगायत समाजात सरकार विरोधी प्रचंड असंतोष पसरला आहे. त्यामुळे सकल लिंगायत समाज छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई येथे एकत्र येत लिंगायत समाजच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले. 

लवकरात- लवकर सरसकट लिंगायताना म्हणजेच हिंदू-लिंगायत, हिंदू-लिंगायत (वाणी), जंगम, तेली, माली, पंचम , बनजगे अशा सर्व जातींना "जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाचा" लाभ घेता यावा असे स्वतंत्र महामंडळ स्थापन करून रु. ५०० कोटी  निधीची तरतूद न केल्यास येणाऱ्या काळात आणखी तीव्र आंदोलने संपूर्ण महाराष्ट्रात करण्यात येतील असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी उपस्थित लिंगायत समाजाचे महेश कोटीवाले, सिद्धाराम शिलवंत, नीलकंठ बिजलगावकर, आनंद गवी, राम लिंगया, सुनील पाटील, अशोक बिराजदार, शंकर संकपाळ, शशी बबलाद, चंद्रशेखर स्वामी , महांतेश बुक्का, स्मिता दमामे, सुवर्णा भद्रे, सुरेखा कोटीवाले, ऐश्वर्या बद्रे, गीता शिलवंत, बिराण्णा बिराजदार, रमेश बैरामडगी, सुनील स्वामी तसेच लिंगायत समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली !!

वशेणी गावात दारूबंदी व हळदीला साडी घेण्याच्या प्रथेविरोधात जनजागृती रॅली !! उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील वशेणी...