जिल्हा परिषद गटांच्या नावात बदल; जिल्हा परिषद व पंचायत समिती गटांचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध !!
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील जि. प. गट व पं. स. गण रचनेचा प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये वाडा तालुक्यातील 6 जिल्हा परिषद गटांच्या समावेश असून जि. प. गट रचनेमध्ये जिल्हा परिषद गटांची नवे बदलण्यात आली आहेत. यात यापूर्वी असणारे गारगाव (31) गटाचे नाव बदलून वरसाळे करण्यात आले आहे तर , मोज (32) गटाचे नाव बदलून गांध्रे, मांडे (33) गटाचे नाव बदलून गालतरे, केलठण (34) गटाचे नाव बदलून खानिवली, आबिटघर (35) गटाचे नाव बदलून खुपरी करण्यात आले आहे. मात्र कुडूस (36) या गटाचे नाव पूर्ववत ठेवण्यात आले आहे. जि.प. गटांचे बदलण्यात आलेल्या नावामुळे जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.
याअगोदर जि.प. गटांना नाव देताना त्या गटातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या ग्रामपंचायतीचे नाव देण्यात येत होते. मात्र यावेळी जि.प. गटाचे नाव देताना त्या गटातील सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या महसूली गावाचे नाव देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील एकूण 6 जि.प. गटांपैकी 5 जि.प. गटांची नावे बदलण्यात आली असून एका जि.प. गटाचे नाव पूर्ववत ठेवण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जि.प. गटांच्या नावात बदल करण्यात आला असून संबंधित जि.प . गटातील सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या महसूली गावांची नावे जि.प. गटांना देण्यात आली आहेत.
- भाऊसाहेब अंधारे
- - तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी वाडा तालुका
वृत्तांत - जयेश शेलार
जेष्ठ पत्रकार / संपादक / वाडा तालुका अध्यक्ष (राष्ट्रवादी काँग्रेस)
No comments:
Post a Comment