माळशेज घाटात संरक्षक भिंतींवर रिफ्लेक्टर लावण्याचे काम सुरू - 'आम्ही नगरकर प्रतिष्ठान' मागणीची घेतली दखल !!
मुरबाड, प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडे आम्ही नगरकर प्रतिष्ठान वतीने माळशेज घाटात पावसाळ्यात धुक्यामुळे नागरीकांना यामध्ये गाडी चालवताना अडथळा येत होता रस्ताचा बाजूला खोल दरी असल्याने वाहनचालक हे अंदाजावर गाडी चालवत असत यामुळे अपघात होऊन मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती,याबाबत आम्ही नगरकर प्रतिष्ठान वतीने कार्याध्यक्ष बजरंग तांगडकर यांनी माळशेज घाटात रिफ्लेक्टर लावण्यासाठी मागणी केली होती याबाबत तातडीने याची दखल घेत NHAI विभागा अधिकारी कार्यकारी अभियंता - ज्योती शिंदे ,
उपविभागीय अभियंता -- धनाजी टिळे, शाखा अभियंता - मितेश पालशेतकर अभियंता, कर्मचारी व कामगार यांनी तातडीने दखल घेत घाटात वारा, पाऊस, जंगली प्राणी, दरड कोसळण्याची भिती न बाळगता सातत्याने काम सुरू ठेवले असून आम्ही नगर प्रतिष्ठान वतीने NHAI अधिकारी कार्यकारी अभियंता - ज्योती शिंदे ,
उपविभागीय अभियंता -- धनाजी टिळे,
शाखा अभियंता - मितेश पालशेतकर
कर्मचारी वर्गाचे धन्यवाद देत आभार मानले.
No comments:
Post a Comment