Wednesday, 16 July 2025

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कडून रुचिता नाईक यांचा मोफत २४ तास रूग्णवाहिकेचे कौतूक !!

उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे कडून रुचिता नाईक यांचा मोफत २४ तास रूग्णवाहिकेचे कौतूक !!

** शेकडो रुग्णांचे वाचले प्राण ! मोफत २४ तास रुग्णवाहिका सेवेचा नागरिकांना लाभ....

नालासोपारा, प्रतिनिधी :- शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांचे कार्य पाहून समाजात माणुसकी अजून जिवंत आहे हे दिसून येते. आपल्या छोट्याशा व्यवसायातून मिळणार्‍या उत्पन्नातून रोज हजारो रुपये खर्च करून नागरिकांना मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देणारी पालघर जिल्ह्यातील प्रथम महिला आहेत.
 
रुग्णांना जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा त्यांची मदत करण्यास शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक तयार असतात जात, धर्म, पंथ असा कोणताही भेद न करता गरजू रुग्णांना मदत करत असतात भरती असलेल्या गरजू रुग्णास रक्ताची गरज असो किंवा डॉक्टरांची मदत एक फोन करा रुचिता नाईक मदतीला धावून येतात समाजकार्याचा वसा घेतलेल्या रुचिता नाईक यांनी शेकडो नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. याच कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कार्याचे कौतुक केले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...