खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात आधार कार्ड शिबिरांचे आयोजन !!
कल्याण लोकसभा मतदारसंघात हजारो नागरिकांना आधार कार्डा मध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुरूस्ती / सुधारणा करायची आवश्यकता असल्याने सदर नागरिक बंधू-भगिनी जवळच्या असलेल्या आधार नोंदणी केंद्रात जात असतात परंतु त्यांना सेवा पुरविण्यामध्ये आधार नोंदणी केंद्रांची संख्या अपुरी आहे. या अनुषंगाने कल्याण लोकसभा मतदार संघातील कळवा - मुंब्रा, दिवा, खोणी पलावा, डोंबिवली पूर्व, कल्याण पूर्व, उल्हासनगर कॅम्प नंबर ५ तसेच अंबरनाथ पूर्व विभागातील कार्यालयांमध्ये अनेक नागरिक याबाबतची तक्रार करत होते. यामुळे आधार कार्ड विषयक विविध प्रकारच्या दुरुस्ती करून मिळणे तसेच १८ वर्षापर्यंत नवीन आधार कार्ड काढून मिळणे बाबतच्या कामांसाठी गार्हाणी घेऊन येत असलेल्या नागरिकांची आधार कार्ड विषयक कामे करून त्यांचे समाधान करून देण्यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघात खालील दिलेल्या पत्त्यावर, खालील दिलेल्या कालावधीमध्ये आधार कार्ड शिबिरांचे आयोजन खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खासदार जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले.
या आधार कार्ड शिबिर मालिकेचा पहिला भाग म्हणून आज सोमवार दिनांक ७ जुलै २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता आमदार श्री राजेश गोवर्धन मोरे यांच्या शुभहस्ते पहिल्या शिबिराच्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडला. या आधार कार्ड शिबिराची सुरूवात फॅशन मॉडेल असलेल्या आणि सन मराठी वरील आदिशक्ती तसेच झी मराठी वरील कमळी या कार्यक्रमात पाहुणे कलाकाराचा रोल अदा करणाऱ्या सुषमा ताई लाड यांच्या आधारकार्ड पत्त्यात बदल करण्याच्या कामाने सुरूवात करण्यात आली.
सदर शुभप्रसंगी खोणी गावचे सरपंच श्री हनुमान ठोंबरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री राजेश शांताराम कदम, युवा सेना डोंबिवली शहर प्रमुख श्री सागर जेधे, शिवसेना कल्याण तालुका सचिव श्री बंडूशेठ पाटील, महिला आघाडीच्या जिल्हा संपर्क संघटक कविताताई गावंड चौधरी, पलावा विभागाचे विभाग प्रमुख श्री अभिजीत गुरव, खोणी गावचे शाखाप्रमुख श्री मारुती ठोंबरे, डाउनटाऊन विभागाच्या महिला संघटक दीपाताई झुजारे, कार्यकर्ता इस्माईल शेख, खासदार कार्यालयाचे कर्मचारी श्री डॅनियल पीटर, श्री समीर मदगे तसेच शिवसेनेचे महिला पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आधार कार्ड नोंदणी आणि आधार कार्ड मध्ये विविध प्रकारच्या दुरुस्ती करण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आधार कार्ड शिबिर मालिका आयोजित करावयाच्या खासदार कार्यालयांची पत्त्यांसहित, दिनांक निहाय माहिती खालील प्रमाणे:
१: कल्याण ग्रामीण विधानसभा,
पत्ता - खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय, लेकश्योर ग्रीन्स, पलावा फेज - २, तळोजा बायपास रोड, खोणी, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे,
पिन कोड नं- ४२१२०४
सोमवार दिनांक ७ जुलै २०२५ ते १२ जुलै २०२५ पर्यंत
संपर्क - डॅनियल पीटर
मोबाईल नं. 84 33 62 33 33
२. कल्याण ग्रामीण विधानसभा, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय
पत्ता : १, वैभव कॉम्प्लेक्स, मुंब्रा देवी कॉलनी, वाडेकर विद्यालयासमोर, दिवा पूर्व, जिल्हा ठाणे.
पिन कोड नं- ४००६१२
सोमवार दिनांक १४ जुलै २०२५ ते १९ जुलै २०२५ पर्यंत
संपर्क - समीर मदगे -
मोबाईल नं - 70454 24203
३. कल्याण पूर्व विधानसभा:
पत्ता: खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय, स्टार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसमोर, श्रीमलंग रोड, चक्की नाका, कल्याण पूर्व,
पिन कोड नं-४२१३०६
सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ ते २६ जुलै २०२५ पर्यंत
संपर्क - सर्वेश मिश्रा
मोबाईल नं. -79775 15750
रणजित म्हात्रे
मोबाईल नं. - 7977474107
४. अंबरनाथ विधानसभा:
पत्ता: खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय,
७, पनवेलकर प्राईड, तळमजला, सिताई सदन, कोटक महिंद्रा बँकेजवळ, अंबरनाथ स्टेशन रोड, अंबरनाथ पूर्व,
पिन कोड नं- ४२१५०२
सोमवार दिनांक २८ जुलै २०२५ ते २ ऑगस्ट २०२५ पर्यंत
संपर्क - संतोष गोरेगावकर
मोबाईल नं - 92707 00665
५ . मुंब्रा-कळवा विधानसभा:
पत्ता: खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय, ०४, अशर अराईज, गाळा नं ७, पुणे मुंबई हायवे, सह्याद्री शाळेच्या मागे, बुधाजी नगर, कळवा पश्चिम, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र.
पिन कोड नं- ४००६०५
दिनांक - ४ ऑगस्ट २०२५ ते ९ ऑगस्ट २०२५ पर्यंत.
संपर्क - अजय खरमरे
मोबाईल नं - 93090 95725
समीर मदगे -
मोबाईल नं - 70454 24203
६. उल्हासनगर विधानसभा:
पत्ता: खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे जनसंपर्क कार्यालय, गोल मैदान, साधू वासवानी उद्यानासमोर, उल्हासनगर - ३, उल्हासनगर,
पिन कोड नं- ४२१००५
सोमवार दिनांक ११ ऑगस्ट २०२५ ते १६ ऑगस्ट २०२५ पर्यंत
संपर्क - अरूण तांबे
मोबाईल नं - 95521 20444
प्रसिद्धी / माहिती साठी __
प्रकाश शांताराम माने.
कार्यालय प्रमुख, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचे कार्यालय आणि माजी नगरसेवक.
No comments:
Post a Comment