Sunday, 20 July 2025

मुरबाड मध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न !!

मुरबाड मध्ये शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा संपन्न !!

**आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा - शिवसेना नेते -प्रकाश पाटील

मुरबाड, (मंगल डोंगरे) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्त्यांनी कामाला लागा, असा आदेश शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रकाश पाटील यांनी मुरबाड तालुक्यातील सरळगाव कावेरी हाॅल येथील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, आणि युवती सेना, आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सांगितले.आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी संघटना बांधणी करताना,प्रथमतः सभासद नोंदणी वर जोर दिला पाहिजे. आपण ज्या गावात -शहरात राहतो त्या ठिकाणी आपल्या कामातून आपली ओळख निर्माण करा. तसेच ज्या पक्षात आपण काम करतोय, त्या पक्षनेत्रुत्वानी म्हणजेच माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील जनतेसाठी केलेल्या योजना, घराघरात पोहचवा , जनतेला जाऊन सांगा, येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत जनता तुम्हाला नक्कीच सहकार्य करेल. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण लोकसभा, विधानसभा निवडणुका लढलो आणि त्या जिंकलो सुद्धा, त्याच प्रमाणे आगामी जि.प.पं.स. निवडणुका जिंकायच्या आहेत. सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या झंझावाताचा आपण उपयोग करून घ्यायचा आहे.आपण शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी अनेक विकासाची कामे केली आहेत. त्या सर्वांना सोबत घेऊन काम करा. यासाठी लाडक्या बहिणींचीही ताकद पक्षाला कामी येणार आहे. तरच आगामी निवडणुकीत यश मिळविता येईल. असा मार्मिक सल्ला ही प्रकाश पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. शिवसैनिक कधीही खंत व्यक्त करत नाही.तो लढवय्या आहे. विरोधकांवर टिका टिप्पणी करण्यापेक्षा आपलं काम नीटनेटके करा, आणि स्वमेहनतीने  आपलं अस्तित्व निर्माण करा. आपल्या कर्तृत्वाचा लोकांनी सन्मान केला पाहिजे. चांगली माणसं जोडण्याचे काम करा. पक्षहितासाठी कर्तृत्ववान माणसांची निवड करा. आणी निवडणुका जिंकण्यासाठी सभासद नोंदणी वाढवा. आपण तिथेच कमी पडतो. असा ही मोलाचा सल्ला प्रकाश पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन करताना दिला. तर आगामी निवडणुकी पुर्वी तुमच्या पक्षात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यां बाबत तुमची काय भुमिका असेल ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय असेल. आमच्या पक्षात नव्याने येणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागतच असेल.असे त्यांनी सांगितले.    

यावेळी या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी, शिवसेना नेते प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख अरविंद मोरे, उप जिल्हा प्रमुख सुदाम पाटील, महाराष्ट्र उपसचिव एकनाथ शेलार, जेष्ठ नगरसेवक एकनाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख विलास देशमुख, संजय भानुशाली, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे, सहसंपर्कप्रमुख संतोष जाधव, कल्पेश धुमाळ, आप्पा यशवंतराव, नगरसेवक नितीन तेलवणे, नगरसेवक विनोद नार्वेकर, नगरसेवक अक्षय रोठे, नगरसेविका नम्रता तेलवणे, महिला आघाडीच्या जेष्ठ कार्यकर्त्या उर्मिला ताई लाटे, सुनिता पवार, दिपा शिंदे, रामचंद्र सासे, प्रदिप घिगे, विष्णू चौधरी, निलेश चौधरी यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !!

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे उपोषण स्थगित ; JNPA चेअरमन वाघ यांच्या आश्वासनानंतर निर्णय !! उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : जवाह...