रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड महेंद्र निकम यांची नियुक्ती !!
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी मा आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष पदी ॲड.महेंद्र निकम यांची निवड करण्यात आली आहे, त्यांचा आंबेडकर चळवळी त नेहमी सक्रिय सहभाग असतो, त्यांना सामाजिक जाणीव असल्याने, उल्हासनगर शहर हे ठाणे जिल्ह्यातील व्यापारी केंद्र म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, मागील अनेक वर्षांपासून या शहराचा झपाट्याने विकास होत आहे. हा भाग तसा मिश्र भाषिकांचा असला तरी मोठ्या प्रमाणात झोपडपट्टयांनी आणि दाटीवाटीने वसलेल्या घरांनी गजबजलेला आहे, आंबेडकरी बालेकिल्ला असलेले काही महत्त्वाची ठिकाणं या शहरात आहेत, या बाबत ॲड महेंद्र निकम यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करून पक्षनेते मा. आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या इच्छेप्रमाणे पक्षबांधणी करण्याबाबत कोणी सक्षम कार्यकर्ता तूमच्या संपर्कात असल्यास माझी भेट करून द्यावी असं सांगीतलं, रिपब्लिकन सेनेत बरेच पदाधिकारी अनेक वर्षे पदं अडवून बसले आहेत, ते साधी कार्यकारिणी सदस्य नोंदणी करु शकत नाहीत, आम्ही फार जूने आहोत आम्ही आंबेडकरी घराण्याचे कट्टर निष्ठावान कार्यकर्ते आहोत, आम्ही पक्ष टिकवून ठेवला आहे, असं सांगत असतात परंतू आपल्या नेत्याच्या पक्ष संघटना वाढीसाठी भ्रमनिरास करून ते आनंदराज आंबेडकर साहेबांचा विश्वासघातच करीत नाही का हा प्रश्न पडतो.
अशी चर्चा सुरू असताना ॲड महेंद्र निकम यांनी आणि प्रविण मिर्के यांनी उल्हासनगर शहर जिल्ह्याची पक्ष बांधणीसाठी जबाबदारी स्विकारली आणि संपूर्ण उल्हासनगर शहर महापालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेऊन रिपब्लिकन सेनेची परिपूर्ण शहर कार्यकारिणी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले, या वेळी माझ्या मनात विचार आला की ॲड महेंद्र निकम यांनीच उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी घेतली पाहिजे, आणि हा विचार त्यांना बोलून दाखवला, तेव्हा ते म्हणाले आपण द्याल ती जबाबदारी स्विकारण्याची माझी तयारी आहे, मा आनंदराज आंबेडकर साहेब आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप सन्मानाची वागणूक देतात, मग त्यांनाही आपल्याकडून पक्षाच्या वाढीसाठी खूप अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, त्यामुळे कमी वेळात मी उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
रिपब्लिकन सेना उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष ॲड महेंद्र निकम साहेब यांना हार्दिक शुभेच्छा !
**** आबासाहेब चासकर अध्यक्ष ठाणे जिल्हा रिपब्लिकन सेना
वृत्तांत - प्रकाश पवार, जेष्ठ पत्रकार व समाजसेवक
No comments:
Post a Comment