गोरगरिबांच्या मशीहा, निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेचे शैक्षणिक कार्य कौतुकास्पद !!
**** तळागाळातील लोकांना जिजाऊ संघटना देतेय मदतीचा हात
मुरबाड, (मंगल डोंगरे) : **जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे** या काव्य पंक्ती प्रमाणे, संपूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यात ज्यांचे समाजकार्य गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय जोमाने आणि विश्वासाने सुरू आहे. ज्यांना गोरगरिबांचा मशीहा म्हणून ओळखले जाते. ते त्यांच्या जिजाऊ या संस्थेच्या माध्यमातून हजारो गोरगरीब जनतेला कुठलीही जात धर्म न विचारता फक्त समोरच्या व्यक्तीची अडचण काय आहे. आणि ती कशी सोडवता येईल याकडेच प्राधान्याने लक्ष केंद्रित करून मदतीचा हात पुढे करतात. मग ती मदत शैक्षणिक कामासाठी असो, आजारपणासाठी असो, निलेश सांबरे आणि त्यांची जिजाऊ संघटना ही आघाडीवर असते. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची संस्था सध्या शाळा सुरू झाल्या पासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप करत आहे. यावर्षी हजारो विद्यार्थ्यांना वह्या, दप्तर, चटई,असे साहित्य देत आहे. काल असाच साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद शाळा खोपीवली येथे संपन्न झाला.त्यात जवळपास येथील 300 हून अधिक विद्यार्थ्यांना हे साहित्य वाटप करण्यात आले.
खोपिवली गावामध्ये मोफत वह्या वाटप ,पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना एकूण 300 विद्यार्थ्यांना 665 वह्या मोफत वाटण्यात आल्या. याप्रसंगी धीरज सांबरे जिजाऊ संघटना कार्याध्यक्ष व शिवसेनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष कांतीलाल कंटे, संजय भानुषाली सज्जन जमदरे, वैभव मसने, जिजाऊ मुरबाड तालुका अध्यक्ष दिनेश धलपे, सुरज सिरोसे, गोपाल दादा भोडिवले, बबलु शिरोसे, व ग्रामस्ध मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
No comments:
Post a Comment