Sunday, 20 July 2025

मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांचा बोनस प्राप्त शेतकऱ्यां कडून ह्रदय सत्कार !!

मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांचा बोनस प्राप्त शेतकऱ्यां कडून ह्रदय सत्कार  !!

मुरबाड, (मंगल डोंगरे) : मुरबाड तालुक्यातील बोनस प्राप्त  शेतकऱ्यांकडून आज मुरबाडचे तहसीलदार उत्तम प्रशासक, "आदर्श प्रशासकीय अधिकारी अभिजित देशमुख" यांचा ह्रदय सत्कार तर शेतकरी संघर्ष समितीचे नेते 'लोक मित्र रमेश  हिंदुराव सर' यांचा महसूल प्रशासनास योग्य असे सहकार्य केल्याबद्दल प्रशासना कडून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तब्बल13 वेळा धरणे आंदोलन, उपोषण, मोर्चा काढुन, पण शांततेच्या मार्गाने संघर्ष करुन प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या तर्फे शाल, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी शेतकरी संघर्ष समितीचे शेतकरी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित होते. मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांना २०२०-२०२१ या वर्षातील बोनस मिळण्यासाठी समितीने अनेकदा धरणे-आंदोलने मोर्चे काढून शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न केले. त्या-त्या वेळी उत्तम प्रशासक असलेले तहसीलदार श्री.अभिजित देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे, अर्ज, निवेदने यांची दखल घेऊन तातडीने वरिष्ठ पातळीवर पाठवुन, त्याचा पाठपुरावा करून ख-या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. तदनंतर दिनांक 23 जुन 2025 ला शेतकरी संघर्ष समितीने पुन्हा एकदा बोनस मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण केले. यावेळी ही तहसीलदार महोदयांनी कुठल्याही प्रकारचा विलंब न करता वरिष्ठ पातळीवर चर्चा करून शेतकरी हिताचा निर्णय घेतला.आणि आठ दिवसांच्या कालावधीत थकबाकीत असलेली बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा झाली. या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वाचा दुव्वा ठरलेल्या मुरबाड चे तहसीलदार अभिजित देशमुख यांच्या प्रति क्रुतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी नेते रमेश हिंदुराव सर व प्रातिनिधिक स्वरूपात तालुक्यातील शेतकरी, यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न !!

गुणवत्ता वाढीस चालला देणारा ध्वजारोहणाचा भादाणे पॅटर्न !! ....*राज्यात प्रथमच ठाणे जिल्ह्यातील "भादाणे गावातील जिल्हा परिषद...