रस्त्यावर रॅबिटने भरलेल्या गोण्यांचा नागरिकांना त्रास ; संबंधित गोण्या टाकणाऱ्या कंत्राटदार व्यक्तीला मनपा घ.क.व्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा आशिर्वाद !!
घाटकोपर, (केतन भोज) : अमृत नगर ओएनजीसी कॉलनी बँक ऑफ इंडिया समोरील मुख्य रस्त्यावर सतत रॅबिटने भरलेल्या गोण्या टाकल्या जात आहेत. बांधकामाचे कंत्राट घेणारा येथील एक स्थानिक कंत्राटदार व्यक्ती वारंवार सतत तोडकाम करण्यात आलेल्या बांधकामांच्या रॅबिटने भरलेल्या भरमसाठ गोण्या मुख्य रस्त्यावर टाकत आहे. तसेच बाजूलाच असलेल्या मोठ्या नाल्यातही हा कंत्राटदार व्यक्ती रॅबिटने भरलेल्या गोण्या टाकून देत आहे. मुख्य म्हणजे मुख्य रस्त्यावर या गोण्या टाकत असल्यामुळे याठिकाणी आता पावसाळ्यात पावसाच्या पाण्याला या गोण्या अडथळा ठरत असून यामुळे याठिकाणी कचरा साचून आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांना आणि वाहनांना येण्या-जाण्यास या गोण्यांमुळे अडचण निर्माण होत आहे आणि आरोग्याच्या समस्याही वाढण्याची शक्यता आहे. याबाबत याठिकाणी समोरच असलेल्या अमृत नगर मनपा एन विभाग घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या चौकीमध्ये येथील संबंधित चौकीचे अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार देण्यासाठी गेल्यास ते बोलतात मी यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू शकत नाही कारण त्या कंत्राटदार व्यक्तीचे आमच्या विभागाच्या वरिष्ठ लेव्हलला हात पोहचले असून तो वरपर्यंत हाप्ते देऊन अधिकाऱ्यांना मॅनेज करतो. त्यामुळे मी यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करू शकत नाही. या कंत्राटदार व्यक्तीला वरिष्ठांचा आशिर्वाद आहे असे मनपा चौकी प्रमुख यांचे म्हणणे आहे. तसेच वारंवार याबाबत तक्रार करूनही संबंधित मनपा घन कचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी रस्त्यावर रॅबिटने भरलेल्या गोण्या टाकणाऱ्या व्यक्तीवर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नसून त्यांच्याच कृपाशीर्वादाने या व्यक्तीचे फावले आहे असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच नागरिकांच्या समस्यांचे आणि तक्रारीचे संबंधित प्रशासनाला काहीही पडले नसल्याचे याठिकाणी दिसत आहे.
No comments:
Post a Comment