"करकरे साहेब क्षमस्व"
मा.करकरे साहेब आणि शहिद साथी,
आम्ही दिलगीर आहोत,
निर्दयी आहोत,
कृतघ्न आहोत,
नालायक आहोत,
पात्रता नाही आमची तरी आम्हाला क्षमा करा...
केवळ हातात काठी घेऊन,
खाकी गणवेशाच चिलखत घालून,
मुंबई पोलिस सरसावले होते
अत्त्याधुनिक शस्त्रसज्ज,
आंतरराष्ट्रीय जेहादी हल्ल्यासमोर
कुठून आली उर्जा या साध्या सुध्या माणसात
करकरे साहेब?
समोर मृत्यु दिसत होता,
रक्ता मांसाने मुंबई लडबडली होती,
प्रत्येक शिपाई किल्ला झाला होता
केवळ तुमच्या विश्वासावर
रात्रभर देश रक्षणासाठी,
प्राणांची आहूती देत होता,
अतिरेक्यांना वेढून होता..
कुठल्या चैतन्याने हि साधी माणसं उभी होती,
करकरे साहेब?
आम्ही शेवटच तुम्हाला पाहिल,चिलखत घातलेल
ह्र्दयाचा ठोका चुकला होता भितीने,
काहि अघटिताची पाल चुकचुकली
आणि ,उत्तर रात्री नको ती बातमी आली
तुमच्या मित्रांसह तुमच कलेवर
याच मुंबईत बेवारस पडलेल आम्ही पाहिल
खर सांगतोय करकरे साहेब
जाणीव झाली डोक्यावरच छत्र हरपल्याची
कापर भरल शरीर
सत्य नाकारत होत,पण तुमचा मृत्यु सत्य होता
तरीहि सूर्योदया पर्यंत तुमच्या साध्या माणसांनी
जेहादींना जेरबंद केल होत,करकरे साहेब!
आम्ही पाहिलीय तुमची महायात्रा
तुमचा तो युनिफाॅर्म-हॅट घातलेला करारी चेह-याचा फोटो
फुलांनी झाकलेल तुमच कलेवर
करकरे साहेब,त्या दिवशी आम्ही पाहिलय
त्या फुलांना मुसमुसतांना,
बिगुलाच -हस्व दिर्घ शोकाकुल आक्रंदतांना
'अमर रहे!'घोषणा देतांना
सारा देश स्तब्ध होतांना,
स्वकिय मृत्यु सम विव्हळतांना!
खरच करकरे साहेब,
तुम्ही आणि तुमचे मित्र कोण होते आमचे?
तुमच्या मृत्यु पश्चात पाहिलय आम्ही
तुमच बुलेट प्रुफ जॅकेट गहाळ होतांना,
चौकशी दिरंगाई होतांना,
धैर्यशील तुमच्या स्वभिमानी पत्नी,मुलांना
राजकिय सौदेबाजांचे एक कोटीचा चेक नाकारतांना
ज्यांनी तुमची "गाढवा वरुन धिंड काढा" म्हटले
त्यांनी तुम्हाला 'शहिद' म्हणून श्रद्धांजली वहातांना...
ऐकताय ना करकरे साहेब!
"अशोक चक्र" "शहिद" विशेषणं तुम्हाला अर्पितांना
आम्ही पाहिलय...साहेब,
तुम्ही शहिद का झालात?अस वाटतय...
जेहादी कोण होते तुमचे?
का उभे राहिलात त्यांच्या समोर निधड्या छातीने?
केवळ six boir रिव्हाॅलवर घेऊन!
त्यांच्या कडची AK-47 ट्रिगर दाबताच
चाळण करत होती लक्षाच...
पळून का नाही गेलात जीव वाचवण्यासाठी?
तुम्हाला ऐकु आली रायगडची 'तुतारी',
आठवली शपथ
जी देशाच्या रक्षणासाठी तुम्ही घेतली होती,
आठवले अशोकचक्र जे गणवेषासह कोरल होत ह्र्दयावर
आठवला तिरंगा-देश आणि आपल कर्तव्य,
विसरलात पत्नी मुलं नातीगोती
सरळ भिडलात मृत्युला ऑन ड्यूटी
कर्तव्य बजावण्यासाठी,
वाचवलेत प्राण निष्पाप देशबांधवांचे
करकरे साहेब,हे विलक्षण आहे...
आज तुमच्या राष्ट्र प्रेमावर शंका घेणारे,
'गद्दार' म्हणणारे, 'एजन्ट' म्हणणारे,
'शहिद'पण नाकारणा-या विकृत मनोवृत्तीकडे
दुर्लक्ष करा....
'त्यांनी' गांधी हत्त्ये नंतर साखर वाटली होती,
घराला तोरणं बांधली होती,शुभेच्छा दिल्या होत्या
तेव्हा तुम्ही गडबडून जाऊ नका साहेब...
आमच्या मनात तुम्ही कायम आहात,
आम्ही कृतघ्न नाही,
नालायक नाही,
निर्दयी नाही फक्त आमच्यातल्या सज्जनांचं मौन आहे!
राष्ट्रवादाच्या गप्पा मारणारे,
दहशतवादाच्या बाता मारणारे,हे दांभिक आहेत
करकरे साहेब "त्यांना"
'क्षमा करा,त्यांना माहित नाही,ते काय करतात'
या येसूच्या निर्धाराने 'त्यांना' क्षमा करा...
करकरे साहेब,त्यांना क्षमा करा !
सादरीकरण / शब्दरचना -
ईशान संगमनेरकर मुंबई.
9821817656.
No comments:
Post a Comment