Friday, 1 August 2025

कोकण कलामंच मुंबई आयोजित महिला विरुद्ध पुरुष शक्ती-तुरा सामन्याचे आयोजन !!

कोकण कलामंच मुंबई आयोजित महिला विरुद्ध पुरुष शक्ती-तुरा सामन्याचे आयोजन !!

** मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रात्रौ ०८:३० वा. दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे रंगणार सामना 

मुंबई (शांताराम गुडेकर)
        श्री गजानन कृपेने कोकण कलामंच मुंबई आयोजित महिला विरुद्ध पुरुष असा शक्ती-तुरा सामना कानसे ग्रुपचा विलेपार्ले येथे आयोजित करण्यात आला आहे.शक्ती- तुऱ्याची आलीया लाट, आम्ही पाहतोय नवीन चेहऱ्यांची वाट... याला साजेसा असा शक्तीवाले शाहीर  हृदया जाधव (उरण-रायगड) गुणी हैबती घराण्यातील गुरुवर्य देवचंद शितकर यांचे पटशिष्य शाहीर चंद्रकांत साळवी बुवा यांची शिष्या कवी रमाकांत जावळे, सुदर्शन जाधव, शाखा जय अंबे नृत्य कलापथक कानसे ग्रुप मुंबई, ढोलकी- सिद्धेश घाणेकर, बेंजो अजय धनावडे, कीबोर्ड संदेश आंबेकर, पॅड -कुंदन साळवी तर तुरेवाले शाहीर सुहास चांदिवडे (खेड-रत्नागिरी), रामचंद्र पंडित घराणे, वस्ताद दिलीप चांदिवडे, गुरुवर्य एकनाथ माळी यांचे शिष्य शाखा जय भवानी नाच मंडळ मु.पो. चिंचवली गोठलवाडी कवी एकनाथ माळी, ढोलकी अनिकेत पाष्टे, बेंजो अश्मी जाधव, कीबोर्ड सुरज कुंचाळे, पॅड -शुभम भायजे यांच्या मध्ये जंगी सामना होणार आहे. यासाठी विशेष सहकार्य - श्री. चंद्रकांत मुरमुरे यांचे लाभले आहे. हा सामना मंगळवार दिनांक ०५ ऑगस्ट २०२५ रात्रौ ०८:३० वा. दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे होणार आहे. कार्यक्रम तिकिटासाठी संदिप कानसे : ९८२१५८६१४४/९५९४६२७३३४ सुभाष बांबरकर : ९८९२३८४४७१ संदेश काटकर : ९००४९२५७०० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...