Sunday, 10 August 2025

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर !!

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर !!

मुंबई, (केतन भोज) : महाराष्ट्र स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे महाराज यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य पक्षाचे नेते सरचिटणीस धनंजय भाऊ जाधव स्वराज्य पक्षाचे नेते उपाध्यक्ष अंकुश कदम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी अँड ओमकार विठ्ठल जाधव- रायगड जिल्हा युवक अध्यक्ष, अजित घाडगे - रायगड जिल्हा उपाध्यक्ष, अमित शिर्के - रायगड जिल्हा युवक सचिव, दिनेश काळंगे - रायगड जिल्हा युवक सहसचिव, मनोहर पाटील - रायगड जिल्हा युवक संघटक, सचिन माने - रायगड जिल्हा युवक उपसंघटक, ऋषिकेश घुले - रायगड जिल्हा युवक उपसंघटक इत्यादी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांची रायगड जिल्हा युवक कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मुंबई विभाग युवक अध्यक्ष संतोष कदम यांनी मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा देत आपण हेवा वाटावा असे कार्य करून गाव तिथं शाखा घर तिथं स्वराज्य या संकल्पनेतून छत्रपती संभाजीराजे महाराज यांचे विचार व पक्षाचे कार्य घराघरात पोहचण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराल असा विश्वास आहे असे मत महाराष्ट्र स्वराज्य पक्ष मुंबई विभाग युवक अध्यक्ष संतोष कदम यांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...