बाटलीवाडी येथे मन्यार जातीचा अत्यंत विषारी सर्प दंशाने चार वर्षीय आदिवासी मुलीचा म्रुत्यु !!
मुरबाड ( मंगल डोंगरे ) : मुरबाड तालुक्यातील पाटगाव ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या व मुरबाड -म्हसा -कर्जत रस्त्यालगत असलेल्या बाटली वाडी या आदिवासी वाडीमध्ये गुरुवारी रात्री मध्यरात्री च्या सुमारास घरातील सर्व माणसे झोपलेल्या अवस्थेत असताना, मन्यार जातीच्या अत्यंत विषारी जातीच्या सापाने अंथरुणावर झोपलेल्या एका चार वर्षीय मुलाला दंश केल्याने तिला उपचारासाठी मुरबाड वरुन उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जात असताना, रस्त्यात असताना, उपचारा अभावी म्रुत्यु झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मयत मुलगी कु.माणसी, हिचे वडील श्री.चंद्रकांत खांडवी यांचे दोन वर्षांपूर्वी मासेमारी करण्यासाठी बारवी नदीवर गेला असता, पाण्यात बुडुन म्रुत्यु झाल्याने कर्ता कमावता पुरुष घरातुन निघून गेल्याने या घराला कोणी आधार उरला नाही. त्याच्या पाठीमागे पत्नी व तीन मुली, असा परिवार, त्यानंतर पत्नी मोलमजुरी करून मुलींचे कसेबसे पोटापाण्याची खळगी भरण्याचा प्रयत्न करत होती. तर पुन्हा एकदा काळाने या दुर्दैवी कुटुंबियांवर घाळा घालून या निरागस मुलीचा बळी घेतला. एकत्रित झोपलेल्या तीन मुली व त्यांची आई, यांच्यातुन सर्वांत लहान असलेल्या कु.माणसी हिस दंश करून तो मोठ्या बहिणीच्या उशाजवळ दडुन बसला होता. माणसीने जोराने आवाज करुन आपल्या आईला सांगितले. की माझ्या पायाला काही तरी चाललं. असे म्हणताच तिच्या आईने घाई गडबडीत ऊठुन घराशेजारील माणसांना आवाज दिला. तेव्हा शेजारच्या लोकांनी शोधाशोध केली असता, हा साप त्याच अंथरुणावर झोपलेल्या दुसऱ्या मुलीच्या उशापाशी दडुन बसलेल्या अवस्थेत पहावयास मिळाला. त्याचक्षणी त्याला मारुन सोबत घेऊन ते लोकं पिडीत मुलीला मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयात आले. मात्र तेथील ड्युटी वर असलेल्या डॉक्टरांनी आमच्याकडे औषधे, इंजेक्शन उपलब्ध नाहीत.तुम्ही उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा म्हणून सांगितले. त्यावेळेस उपचारास उशीर झाल्यामुळे पुढे नेत असतानाच दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्या चिमुकल्या मुलींची प्राणज्योत मावळल्या ने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुरबाड हे संपूर्ण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे ग्रामीण भाग, तसेच आदिवासी भागातून येणाऱ्या आपत्कालीन रुग्णांवर कुठल्याही प्रकारचा आजार असो त्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे असताना, येथील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, चालढकल पणा करून गोरगरीबांच्या म्रुत्युस कारणीभूत ठरत असुन, त्यांना ना वरिष्ठांचा धाक आहे.ना लोकप्रतिनिधींचा, जोपर्यंत हि सुस्त असलेली शासकीय यंत्रणा सुधारत नाही. तोपर्यत गोरगरीब, कष्टकरी, आदिवासी,मजुर, निष्पाप बळी जातच राहतील.त्यासाठी लोकप्रतिनिधींनी आरोग्य यंत्रणेवर आपला अंकुश ठेवणे गरजेचे आहे. नुसता दवाखान्यांचा कागदोपत्री दर्जा सुधारुन गरीबांचे जीव वाचणार नाहीत. त्यासाठी दवाखान्यातील यंत्रणा चोवीस तास सक्तपणे कार्यरत राहणे गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment