कल्याण प. टावरीपाडा केडिएमसी वॉटर फिल्टर रोड कायमस्वरूपी कचरा मुक्त करण्याची स्फूर्ती फाउंडेशन ची मागणी !!
(समस्या न सुटल्यास आंदोलन करत ,ब प्रभाग कार्यालयात कचरा टाकणार, ब प्रभाग क्षेत्र उपायुक्तांना निवेदन)
कल्याण, प्रतिनिधी - ब प्रभाग क्षेत्राच्या हाकेच्या अंतरावर असलेला टावरीपाडा, केडीएमसी वॉटर फिल्टर रोड वर कायम कचऱ्याची ढिग जमलेला असतो टावरीपाडा गावाकडे जाणारा व तिथून गौरीपडावा तलावा कडे जाणारा अतिशय मुख्य असा रस्ता परंतु सदैव कचऱ्याच्या ढिग व त्यामुळे भटके कुत्रे, जनावरांचा वावर असतो, त्यामुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना तोंडाला रुमाल व नाक बंद करून जावे लागते, हिच का ती स्मार्ट सिटी जिथे मुलभूत सुविधांचा वनवा ?
नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून ब प्रभाग क्षेत्र उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले यावर कायमस्वरूपी तोडगा निघाव व रस्त्यालगत सुशोभीकरण, वृक्ष कुंड्या ठेऊन कचरा फेकण्यास हा परिसर निषिद्ध करावा अशा उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली असून यावर व प्रभाग क्षेत्रांच्या अधिकाऱ्यांकडून काय उपयोजना होते याची वाट आम्ही पाहत आहोत, अन्यथा नागरिकांच्या आरोग्याच्या हितार्थ, परिसर स्वच्छ रहावा यासाठी आम्हाला आंदोलन करावे लागेल, सदर कचरा ब प्रभाग कार्यालयात आणून टाकू - अशी माहिती स्फूर्ती फाउंडेशन 'अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर' यांनी दिली.
No comments:
Post a Comment