Tuesday, 19 August 2025

मुरबाडमध्ये आगरी सेना आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार सोहल्यात जेष्ठ पत्रकार मंगल डोंगरे तसेच त्यांचे सुपुत्र कलाभूषण नितेश डोंगरे या पितापुत्रांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान !!

मुरबाडमध्ये आगरी सेना आयोजित विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार सोहल्यात जेष्ठ पत्रकार मंगल डोंगरे  तसेच त्यांचे सुपुत्र कलाभूषण नितेश डोंगरे या पितापुत्रांचा समाज रत्न पुरस्काराने सन्मान !!

मुरबाड (प्रतिनिधी) – आगरी सेना मुरबाड तालुका शाखेच्या वतीने नुकताच मुरबाड एम.आय.डी.सी. हॉल येथे विद्यार्थी गुणगौरव व समाजरत्न पुरस्कार सोहळा २०२५ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी आगरी सेनेचे नेते प्रदीप साळवी, मंगेश शेलार, चंद्रकांत ठाणेकर, नारायण अंदाडे, लहू डोंगरे, चिंतामण लिहे, बाजार समितीचे सभापती दीपक खाटेघरे, माजी नगराध्यक्ष रामभाऊ दुधाळे, उपनगराध्यक्षा दिक्षीता वारघडे, नगरसेवक मोहन गडगे, जगन माळी, तसेच हरेश टेकडे, दिलीप शेळके यांसह अनेक मान्यवर, समाजबांधव, गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ निस्वार्थ, निरपेक्ष व झुंझार वृत्तीने पत्रकारिता करणारे  व्हाॅईस ऑफ मिडिया ठाणे  जिल्हाध्यक्ष मंगलजी डोंगरे यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल "समाजरत्न" पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तर मुरबाड सारख्या ग्रामीण भागात राहुन सुद्धा समाजातील अनिष्ट रूढी परंपरा, रीतिरिवाज,व चालु घडामोडी वर आधारित अनेक नाटके, एकांकिका, लघुपटाचे लेखन-दिग्दर्शन करून मुरबाडचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविणारे, "गर्जा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे अध्यक्ष श्री. नितेश डोंगरे यांना "कला आणि संस्कृती क्षेत्रातील समाजरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आले. 

या प्रसंगी मान्यवरांनी पुरस्कारप्राप्तांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी सोहळ्यासाठी उपस्थित झालेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...