शिव प्रतिष्ठानच्या वतीने नेरे येथील गिरीजा फॉउंडेशन अनाथाश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप !!
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : शिव प्रतिष्ठानच्या वतीने पनवेल तालुक्यातील नेरे येथील गिरीजा फॉउंडेशन अनाथाश्रम मध्ये धान्य व खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील, सुषमा मयेकर, प्रियांका ठाकूर, संदीप पाटील, राकेश कुसळे, अविनाश ठोसर, सुरेश बार्वे, अमर सावंत, राजेश शेलार, दीपक, ओंकार, शशांक, आदी मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उपक्रमावेळी संस्थेचे अध्यक्ष सत्यजित पाटील यांनी रायगड मधिल सर्व अनाथ आश्रमा मध्ये प्रत्येक सामाजिक संस्थानी अन्न धान्य किंवा काही आर्थिक मदत देण्याचे उपक्रम राबविले पाहिजे तरच अनाथ मुलांना पुढील आयुष्यासाठी मदत होईल. यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन अनाथाश्रम मधील मुलांना सहकार्य करावे असे आवाहन केले. शिवप्रतिष्ठान करंजाडे या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत शिवप्रतिष्ठान सामाजिक संस्थेने अनाथाश्रम मध्ये अन्न धान्य व खाऊ वाटप केल्याने आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. यावेळी विद्यार्थ्यांनीही या उपक्रमास प्रतिसाद देत आपल्या भावना व्यक्त केल्या.
No comments:
Post a Comment