Tuesday, 19 August 2025

शिक्षणप्रेमी विद्येचे उपासक अशोक ठाकूर यांना देवाज्ञा !!

शिक्षणप्रेमी विद्येचे उपासक अशोक ठाकूर यांना देवाज्ञा !!

उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : संत रामदास स्वामींनी अनेक वचने, श्लोक सांगितली.समर्थ वचन आहे की 'मरावे परी किर्तीरुपी उरावे' जीवन हे क्षणभंगुर आहे जिवनात येताना पाठीमागे काही तरी आठवण ठेवून जावे व ती आठवण समाजोपयोगी ठरेल अस काही तरी असावे.आत्माराम ठाकूर मिशन संचलित व जानकीबाई जनार्दन ठाकूर स्कुल आवरे चे संस्थापक व अध्यक्ष एक शिक्षण प्रेमी विद्येचे उपासक अशोक ठाकूर यांचे देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वा  दुःखद निधन झाले. अशोक ठाकूर यांनी स्वतः १५ ऑगस्ट रोजी आपल्या शाळेतील स्वतंत्रता रॅली ही स्वतः पाहिली.त्यात सहभाग घेतला व नंतर देह त्यागला. स्वामी विवेकानंद यांचे विचार व व्यक्तिमत्त्व यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. जीवनाला आदर्श मानत शिक्षकी पेशा हा व्यवसाय स्वीकारून विद्यार्थी हित आयुष्यभर जपत शिक्षणाची कास  उराशी धरुन विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण कसे देता येईल आपला विद्यार्थी जागतिक पातळीवर कसा  ठसा उमटविण्यासाठी इंग्रजी या भाषेवर प्रभुत्व कसे मिळविता येईल याकडे ठाकूर यांचे नेहमीच लक्ष असायचे.जगाची भाषा ही इंग्रजी आहे ते ज्ञान अवगत करण्यासाठी मायभूमीत आपल्या आई च्या स्मृतिप्रीत्यर्थ जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कुल आवरेची स्थापना केली. विज्ञान या शाखेचे पदवीधर असल्याने विज्ञान व गणित या या विषयावर अशोक ठाकूर यांचे विशेष प्रभुत्व होते.अतिशय उत्तम पध्दतीने शिकवत असत. शिक्षकी पेशाची सुरवात कर्मवीर अण्णाच्या रयत शिक्षण संस्थेत खालापूर येथील न्यु इंग्लिश स्कुल वावलें येथून केली.तसेच कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोन न्यु इंग्लिश स्कुल, रिटघर न्यु इंग्लिश स्कुल  डोलखांब,खोपटे भाग शाळा सर्व शाळांवर अध्यापन चे काम केले. तसेच सुरुवातिला पदवीधर असताना रामचंद्र म्हात्रे विद्यालय आवरे येथे ज्ञानार्जन केले. ठाकूर यांनी आपल्या कारकिर्दीत दर्जेदार विद्यार्थी घडविले. अशोक ठाकूर यांच्या अंतयात्रे समयी अंत्यसंस्कार या समयी सर्वच क्षेत्रातील लोक व विद्यार्थ्या वर्ग हे ठाकूर यांना आदरांजली देण्यासाठी मोठया संख्येने उपस्थित होते.या समयी विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी ठाकूर यांची साधी राहणी व उच्च विचारसरणी तसेच त्यांचा जीवनप्रवास तसेच ठाकूर यांचे कार्य अनमोल आहे, सर्वांनी ठाकूर यांच्याकडुन प्रेरणा घ्यावी अशी आपली प्रतिक्रिया शोक संदेशात व्यक्त केली.जो पर्यंत सूर्य चंद्र व हे विश्व आहे तो पर्यंत अशोक ठाकूर यांचे नाव हे शिक्षण क्षेत्रात अजरामर राहील यात तीळमात्रही शंका नाही असे प्रकाश पाटील, सुधाकर पाटील, एम,के.म्हात्रे, महेश गावंड यांनी शोक व्यक्त केला. सदर प्रसंगी अशोक ठाकूर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य असा जनसमुदाय आवरे स्मशानभूमीत उपस्थित होता. मृत्य प्रसंगी ठाकूर सर यांचे वय ५७ वर्ष होते. अशोक ठाकूर यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबियांवर शोक कळा पसरली आहे.हे दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देवो अशी प्रार्थना सर्वांच्या वतीने करण्यात आली आहे.अशोक ठाकूर यांचे दशविधी दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी उरण तालुक्यातील वशेनी खाडी येथे  व उत्तर कार्य हे  राहत्या घरी आवरे येथे त्याच दिवशी होईल. कोणत्याही प्रकारचे दुखवटे यावेळी स्वीकारले जाणार नाही असे त्यांच्या कुटुंबियांतर्फे कळविण्यात आले आहे. जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कूल आवरे, ता - उरण, जिल्हा रायगडचे संस्थापक, रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून ज्ञानार्जन करणारे, विद्यार्थी प्रिय, पालकांचे लाडके, आवरे गावाचे भूषण, कोरोना सारख्या महाभयंकर साथीच्या काळात जानकीबाई जनार्दन ठाकूर इंग्लिश मेडीयम स्कूल येथे सन २०२० ते २०२१ या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या ३१८ विद्यार्थ्यांची फी माफ करून पालकांचे मनोबल वाढवून पालकांना धीर देणारे तसेच अनेक सामाजिक कार्यात सढळ हाताने मदत करणारे, रात्रंदिवस गरिबांसाठी झटणारे, सर्वांच्या सुखदुःखात धाऊन जाणारे, गावातील मंदिर बांधकामासाठी श्रद्धेने मदत करणारे अशोक ठाकूर सर यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...