Sunday, 3 August 2025

'कोडिंगचे पाऊल भविष्याकडे' -

'कोडिंगचे पाऊल भविष्याकडे' -

*** उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालया*त वेबसाइट डिझाइन  स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद - (कु. सुबोध सेमवाल विजेता)

विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

२१ वे शतक हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जात आहे. विषय समृद्धी उपक्रमांतर्गत विरारच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित कै. पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या 'माहिती तंत्रज्ञान' विभागातर्फे शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी वेबसाइट डिझाइन स्पर्धा उत्साहात पार पडली.
 
सदर स्पर्धेत महाविद्यालयातील  बारावीच्या जवळपास 62 विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही विभागात सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता आणि तांत्रिक कौशल्य दाखवत शून्यातून वेबसाइट तयार करण्याचे आव्हान पेलले.

सदर स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही रेडीमेड टेम्पलेट्स किंवा AI-निर्मित कोड वापरले गेले नाहीत. विद्यार्थ्यांनी पूर्ण वेबसाइट स्वतःच्या कल्पनाशक्तीने, मेहनतीने आणि कौशल्याने निर्माण केल्या. ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी केवळ एक तांत्रिक उपक्रम नव्हता, तर त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची आणि भविष्यातील डिजिटल जगासाठी सज्ज होण्याची संधी होती.

या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी स्पर्धाप्रमुख म्हणून कविता पाटील आणि मीनल पाटील सोबत नेहा शिलेदार, भूमिका महाजन, दक्षता पाटील, प्राची जाधव आणि कृपाली म्हात्रे ह्या शिक्षकांनी स्पर्धा आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली. दर्शित कडू आणि चेतन पाटील यांनी तांत्रिक सहकार्य केले.   

स्पर्धा आयटी लॅब मध्ये  दुपारी १२ ते ३ या वेळेत पार पडली. विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक शिक्षणच नाही तर "कोडिंग हे केवळ संगणकासाठी नाही, तर भविष्य घडवण्यासाठी एक शस्त्र आहे हा उद्देश सदर स्पर्धेचा होता. स्पर्धेच्या परीक्षणासाठी विदुला पाटील, मोनिका राऊत, अर्पिता राऊत यांनी महत्वाची जबाबदारी बजावली.  

स्पर्धेच्या निकालात __

वैयक्तिक गटात प्रथम क्रमांक सुबोध सेमवाल, द्वितीय क्रमांक राजा वर्मा आणि तृतीय क्रमांक विभागून पार्थ भिलारे, पुनीत गिलातर त्याचप्रमाणे सांघिक गटात प्रथम क्रमांक अफजल शेख आणि स्वर थुळे द्वितीय क्रमांक विभागून देवकुमार गुप्ता, प्रिन्स गुप्ता आणि चिन्मयी वनारकर, हर्षित मिश्रा तर तृतीय क्रमांक अमान भेरियाणी आणि राज बुधवानी ह्यांना मिळाला.

प्रथम पारितोषिक विजेता कु. __

सुबोध सेमवाल ह्याला महाविद्यालयाच्या वेबसाईटचे डिझाइन करण्याची संधी मिळेल असे ह्यावेळी सांगण्यात आले.

अशा स्पर्धा घेण्यासाठी कायम प्रोत्साहन देणारे ट्रस्टचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, सचिव अपर्णा ठाकूर, व्यवस्थापन समितीचे सदस्य संजीव पाटील, संजय पिंगुळकर, एस.एन पाध्ये, समन्वयक नारायण कुट्टी, समन्वयक कल्पना राऊत, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले, उपप्राचार्य रमेश पाटील, हेमा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...