नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी यांचा वाढदिवस साजरा !!
नालासोपारा, प्रतिनिधी - नालासोपारा पश्चिम पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल वळवी साहेब यांचा वाढदिवस शिवसेना पदाधिकारी यांच्या वतिन पोलीस ठाण्यात पोलीस बांधव सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला
विशाल वळवी हे नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असून त्यांची कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून पोलीस ठाणे परिसरात ओळख आहे. विभागातील नागरिक विशाल वळवी यांना आपल्या हक्काचा अधिकारी या दृष्टिकोनातून पाहत असतात.
दरम्यान: पोलीस म्हटलं की त्यातल्या त्यात वरिष्ठ अधिकारी केबिनमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्याकडे जाणाऱ्या नागरिकांना एक प्रकारची भीती किंवा दडपण निर्माण होत असते. मात्र नालासोपारा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी म्हणून विशाल वळवी यांची नियुक्ती झाल्यापासून नागरिकांना ती केबिन खऱ्या लोकसेवकाची वाटत आहे अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला पुढील आयुष्य निरोगी सुदृढ आणि चांगल्या रीतीने जाण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवर लोकांनी हजेरी लावली होती.
हा वाढदिवस साजरा करण्यासाठी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक शहरप्रमुख आनंद नगरकर, विभागप्रमुख जयराम पंडीत, मनोज लाड, विभाग संघटीका जया गुप्ता, शाखा संघटक वंदना ढगे, उज्ज्वला गाडगिळ व शिवसैनिक उपस्थित होते...
No comments:
Post a Comment