Saturday, 9 August 2025

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न !!

टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा संपन्न !!

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे) :
पंचायत समिती उरण येथे गटविकास अधिकारी यांच्या दालनामध्ये टि बी मुक्त ग्रामपंचायत अभियाना अंतर्गत तालुकास्तरीय टीबी फोरम कमिटीची सभा घेण्यात आली. त्यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र इटकरे, महिला व बाल विकासचे काळे सर, खाजगी वैद्यकीय अधिकारी डॉ. साठे सर, प्राथमिक आरोग्य केंद्र गव्हाणचे  वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्दुल सर, प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली चे वैद्यकीय अधिकारी डॉ.कविता भगत, सर्व सीएचओ, औषध निर्माण अधिकारी श्री. थळे, आरोग्य सहाय्यक व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

सभेमध्ये पुढील चार महिन्यांमध्ये टीबी मुक्त ग्रामपंचायतचे सर्व टार्गेट पूर्ण करून घेण्याबाबत तसेच प्रत्येक उपकेंद्र व ग्रामपंचायत अंतर्गत टीबी विषयी जन जागृती करिता करावयाच्या बाबींबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. उपचारावरील रुग्णांना उपचार पूर्ण करून घेण्याबाबत चे नियोजन, आर्थिक व सामाजिक आधार देण्याबाबत संबंधित ग्रामपंचायत वर जबाबदारी देण्यात आली.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...