मुरबाड ते चिखले व मुरबाड ते बोरगाव रस्ता कायमस्वरुपी खड्डे मुक्त करा - चेतनसिंह पवार
मुरबाड, मंगल डोंगरे : शुक्रवार, दि.१ ॲागस्ट २०२५ रोजी मुरबाड-शिरगांव-चिखले व मुरबाड-पवाळे-बोरगांव खड्डे बाधित नागरिकांची पदयात्रा काँग्रेस तालुकाध्यक्ष इंजि.चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात शिरगाव ते मुरबाड ७ किमी पदयात्रा काढण्यात आली होती. पदयात्रेची सुरवात शिरगांव येथील श्री हनुमान मुर्तीस हार व श्रीफळ उपस्थितीतांच्या हस्ते वाढुन केले तर समारोप तहसील कार्यालय, मुरबाड येथे करण्यात आला. सदरील पदयात्रेच्या प्रमुख मागण्या मध्ये मुरबाड-शिरगांव-चिखले व मुरबाड-पवाळे-बोरगांव रस्ता तत्काळ दुरुस्त करा, दोन्हीं रस्त्याचे रूंदीकरण शेतकऱ्यांना जमिनी हस्तांतरणाचा मोबदला देऊन करा आणि चिखले पुलाची उंची व रुंदी वाढवा तसेच महावितरणचा भोंगळ कारभार दिवसातून १५ ते २० वेळा लाईट जाणे येणे तात्काळ बंद झाले पाहिजे, अश्या आशयाचे निवेदन यावेळी निवासी व महसुल नायब तहसिलदार यांच्या कडे सुपुर्द केले. यावेळी शिरगांव, चिखले, मोहरई , कुडवली, पवाळे, पिंपळगाव, वेलद्याची वाडी, वज्रेचीवाडी, नानकसवाडी, भालुक ठाकरेनगर, मानिवली (गो) बोरगाव-शिंदीपाडा व तालुक्यातील शेकडो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अनिल चिराटे व आभारप्रदर्शन श्री चोरघे यांनी केले तर नंदु शिंदे यांनी मुरबाडी भाषेमध्ये खड्डेग्रस्तांची व्यथा समुदायासमोर मांडली तसेच खराब रस्त्यांमुळे कोळठण परिसरातील जखमी महिलेची कैफियत तुकाराम ठाकरे यांनी मांडली. मुरबाड शिरगाव व मुरबाड बोरगाव रस्त्यावरील खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्त नागरिकांना मंजुर नसून पुढील दहा दिवसांत कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुकाध्यक्ष चेतनसिंह पवार यांनी दिली. यावेळी किसानचे प्रदेश सचिव तुकाराम ठाकरे, युवक तालुकाध्यक्ष धनाजी बांगर, ओबीसी तालुकाध्यक्ष अनिल चिराटे, सिटुचे अध्यक्ष दिलीप कराळे, भरत विशे, श्री चोरघे, आर के शेख, नेताजी लाटे, जयवंत हरड, गुरुनाथ देशमुख, बिपिन भावार्थे, सरपंच दिपक हरड, अमोल चोरघे, मुस्ताक शेख, वसंत कराळे, अमोल चौधरी, नितीन चोरघे, काळुराम गोंधळी, अरुण डोहळे, माजी सरपंच गणपत विशे, विकास चौधरी, दशरथ चौधरी, नियाज शेख, उपसरपंच सुधीर पवार, हरेश पवार, सुनील बाबरे, विश्वास रसाळ, सचिन धुमाळ, निवृत्ती हरणे आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment