Thursday, 7 August 2025

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती !!

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती !!

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती होवून गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे पद स्थापना करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)" या संवर्गातील पदावर पदोन्नती देण्याकरिता तयार करण्यात आलेल्या "पोलीस निरीक्षक (निःशस्त्र)" या संवर्गातील अधिकाऱ्यांच्या "नियमित निवडसूची २०२४-२५" यामध्ये समाविष्ट असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना, "पोलीस उप अधीक्षक / सहा. पोलीस आयुक्त (निःशस्त्र)" या संवर्गातील पदावर सेवाज्येष्ठतेनुसार  पदोन्नती देण्यात आली आहे. पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे 

क्रांतीकुमार तानाजीराव पाटील हे सांगली जिल्यातील तांदुळवाडी गावचे सुपुत्र आहेत. क्राईम ब्रँच मधील त्यांची कामगिरी व कारकीर्द विशेष गाजली. त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल घेवून त्यांना पुणेचे पोलीस कमिशनर अमितेशकुमार यांनी नियुक्ती पत्र दिले.व अभिनंदन केले. पोलीस उप अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे नियुक्ती झालेल्या श्री पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अभिनंदनास्तव विशेष लेख....
बालपणीचे मित्र मा. श्री विलासराव कोळेकर सर, पुणे 

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...