बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर यांच्या संकल्पनेतून ; नागरिकांमध्ये सायबर सूरक्षा जनजागृती अभियान !!
कल्याण, प्रतिनिधी - जगात मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल क्रांती झाली, संपूर्ण जग एका मोबाईल मध्ये येऊन सामावले, परंतु त्याचबरोबर अनेक तोटेही आता समोर येऊ लागले आहे मागील अनेक वर्षांपासून आपल्या संपूर्ण भारत देशात ओटीपी, लिंक माध्यमातून ऑनलाईन पैशांची फसवणूक होत, स्पॅम काॅल, खाजगी माहिती चोरून ब्लॅकमेलिंग प्रकार होत आहे, अनेक नागरिकांना याचा मानसिक त्रास ही झालेला आहे, पैशांची चोरी होत आहे त्याचबरोबर चारित्र्याची बदनामीची धमकी देऊन पैसे उकळले जात आहे, या विषयावर नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी 'स्फूर्ती फाऊंडेशन' व 'महाराष्ट्र उद्योजक परिवार' माध्यमातून मोबाईल वापरताना घ्यावयाची काळजी, सुरक्षितता याबाबत शंखेश्वर प्रेसिडेन्सी, टावरीपाडा परिसरामध्ये सायबर सुरक्षा अभियान राबविण्यात आले.
याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये अधिका अधिक जागृती करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष बजरंग तांगडकर व महिला प्रमुख शिल्पा तांगडकर यांनी दिली.
No comments:
Post a Comment