Monday, 18 August 2025

मधुबनवर भरपावसात कविता बहरली - संजय केणी

मधुबनवर भरपावसात कविता बहरली  - संजय केणी

उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) : विमला तलाव मधुबन कट्ट्यावर कोकण मराठी साहित्य परिषद उरण शाखेचे दरमहा होणारे ११८ वे कवी संमेलन भरपावसातही बहारदार होऊन श्रोत्यांना आनंद दिला असे विचार कविसंमेलनाचे अध्यक्ष संजय केणी यांनी मांडले. साहित्यरत्न रायगड भूषण प्रा एल बी पाटील, शाखाध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे, कट्टा अध्यक्ष राम म्हात्रे यांच्या प्रेरणेने भरलेल्या संमेलनात विशेष कवीचा मान रायगडमधील गुणी कवी अनिल भोईर यांना देण्यात आला. 

कविता वाचन आणि गायनासाठी गणरायाच्या भेटीला खड्ड्यांचा ताफा, स्वरचित गवळण गीते या विषयांवर दर्जेदार कविता सादर झाल्या. सूत्रसंचालन रंजना जोशी, केणी यांनी अतिशय उत्तम केले. कोमसाप बालविभाग प्रमुख संजीव पाटील, समता ठाकूर, संगीत विशारद रमण पंडित, अजय शिवकर, नरेश पाटील, अनामिका सिद्धू राम, शिवप्रसाद पंडित, दौलत पाटील, नाझिया, संजय घबडे इत्यादींनी कविता सादर केल्या.यावेळी तानाजी गायकवाड, सुनील पांडे, विकास पुरो इत्यादींची विशेष उपस्थिती होती. महिला विभाग प्रमुख समता ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले. प्रत्येक महिन्यात १७ तारखेला विमला तलाव येथे कवी संमेलन भरत असते. यावेळीही नेहमी प्रमाणे कवी, साहित्यिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांची विशेष उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...