राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांचा रक्षाबंधन कार्यक्रमात करण्यात आला सन्मान !!
जयपूर राजभवन मध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांना रक्षाबंधन कार्यक्रमात १४३ देशांमध्ये ध्यानधारणेचे प्रशिक्षण देत असलेल्या प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या जयपूर येथील वैशालीनगर सेवाकेंद्राच्या सहसंचालीका बी के चंद्रकला दीदी यांनी राखी बांधली. यावेळी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे यांना निराकार परमपिता परमात्मा शिवबाबांची फ्रेम देऊन बी के चंद्रकला दीदी व १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय ध्यानधारणा प्रशिक्षक डॅा दीपक हरके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी बी के जयंती दीदी, बी के एकता दीदी व बी के रतन भाई उपस्थित होते.
वृत्तांत - सुनील भोसले (पत्रकार)
No comments:
Post a Comment